मुंबई पुन्हा हादरली…! बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई पुन्हा हादरली…! बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या

मुंबई पुन्हा हादरली…! बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या

Updated Oct 13, 2024 07:34 PM IST

malad Murder : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत आणखी एका राजकीय व्यक्तीचीहत्या झाली आहे.मालाड पूर्व येथे दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली आहे.

मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या
मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली आहे. मुंबईतील मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी मालाड पूर्वे येथे रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. आकाश माईन (वय २७ वर्ष) असं हत्या करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या झाली आहे. मालाड पूर्व येथे दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून त्याची हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. आकाश माईन काल विजयादशमी दसरानिमित्त शनिवारी सायंकाळी नवीन गाडी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कट मारल्यामुळे रेल्वे स्टेशनजवळ त्याची एका रिक्षावाल्यासोबत बाचाबाची झाली.

वाद वाढल्यानंतर रिक्षा चालकाचे मित्र आणि स्थानिक फेरीवाल्यांनी घटनास्थळी जमून सुमारे १० ते १५ जणांनी मनसे कार्यकर्ता आकाशवर हल्ला केला. लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आकाश माईनचा मृत्यू झाला. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान बाबा सिद्दीकी यांना वेगळा न्याय आणि मनसे कार्यकर्त्याला वेगळा न्याय का? असा सवाल मनसेकडून उपस्थित करत मनसेने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या पद्धतीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवून दोन आरोपींना तत्काळ अटक केली आहे. व फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे. मात्र मनसे कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात आरोपी मोकाट आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर