मुंबईतील जुहू परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाचा तोल गेल्याने तो दोन वर्षांच्या चिमुकलीवर पडला. या घटनेमध्ये त्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप करत कुटुंबीयांनी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा तोल गेल्याने मुलीच्या अंगावर पडला यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ जानेवारी रोजी घडली. विधी अग्रहरी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ती तिच्या कुटुंबीयांच्या दुकानाजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपी हर्षद गौरव त्यावेळी त्याच्या मित्रांसोबत मौज मस्ती करत होता. त्याचा मित्र शाहनवाज अन्सारीही त्याच्यासोबत होता, मुलीच्या आईने त्यांना इथे खेळू नका आणि दुसरीकडे जा असं सांगितलं होतं. पण ते तिथेच थांबले.
मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हर्षद गौरव मित्रांसोबत मस्ती करताना तोल जाऊन चिमुरडीच्या अंगावर पडला. या घटनेत मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केले. जिथे मुलीवर उपचार सुरू होते, पण दोन दिवसांनी मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ अंतर्गत जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू -
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांसह त्यांच्या वडिलांचा करुण मृत्यू झाला आहे. ही घटना शिक्रापूर चाकण मार्गावर पिंपळे जगताप या गावाजवळ घडली आहे. गणेश संजय खेडकर (वय ३५ रा. पिंपळेजगताप ता. शिरूर )तन्मय गणेश खेडकर (वय ९) आणि शिवम गणेश खेडकर (वय ५)अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत.
संबंधित बातम्या