Mumbai dadar railway station News : मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानकात मोठी गर्दी असते. दादर रेल्वेस्थानक देखील मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वेस्थानक समजले जाते. या रेल्वे स्थानकात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एक व्यक्ति स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर दोन प्रवासी हे ट्रॅव्हल ट्रॉली बॅग घेऊन जात होते. हे दोघेही तुतारी एक्सप्रेसने प्रवास करणार होते. मात्र, रेल्वे पोलिसांची त्यांच्या बॅगेवर नजर गेली. त्यांनी दोघांना थांबले व बॅगेची पाहणी केली तर त्यांना हादरा बसला. या बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यांनी एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह हा कोकणात विल्हेवाट लावण्यासाठी ते तुतारी एक्सप्रेसमधून घेऊन जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार अर्शद अली सादिक अली शेख (वय ३०) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मृतदेह आरोपींनी बॅगेत कोंबला होता. शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा असे आरोपींची नावे असून दोघेही मुकबधिर असल्याची माहिती आहे. यातील शिवाजी सिंग हा फरार झाला आहे. ही हत्या मुंबईतील पायधुनी परिसरात करण्यात आली असून पोलिसांनी हा गुन्हा तेथील पोलिस स्थानकात वर्ग केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दादर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ११ येथे दोघे मूकबधीर व्यक्ती हे तुतारी एक्सप्रेसमध्ये प्रवास करण्यासाठी जात होते. यावेळी त्यांच्या कडे चाके असलेली मोठी ट्रॅव्हल ट्रोली बॅग होती. ही बॅग घेऊन जात असतांना त्यांची मोठी दमछाक झाली होती. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर भीती देखील दिसत होती. दोघेही घामाघूम झाले होते. ही बाब स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव व पोलीस अंमलदार माधव केंद्रे यांनी हेरली. ते गस्तीवर असतांना दोघांचा त्यांना संशय आला. यामुले त्यांनी दोघांना थांबवले व त्यांना बॅग उघडण्यास सांगितली.
दोघांननी बॅग उघडल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. तसेच रेल्वेस्थानकावर देखील खळबळ उडाली. दोघांननी या बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह कोंबला होता. या मृतदेहावर गंभीर घाव होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तेव्हा यातील एक आरोपी हा फरार झाला. त्याला पोलिसानी उल्हासनगर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दुसऱ्याची चौकशी केली असताना, हा मृतदेह अर्शद अली सादिकचा असल्याची माहिती त्यांनी दिली. मृत अर्शद सांताक्रुझच्या कलिना परिसरात राहायला असून शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोघांनी त्याची हत्या केली. सादीकच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघेही हा मृतदेह बॅगेतभरून तुतारी एक्सप्रेसने जात होते. मात्र, पोलिसांना आलेल्या संशयामुळे त्यांचा प्लॅन फासला. पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही देखील जप्त केले आहे. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करुन आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.