Mumbai Rape: मुंबईत एक धक्कादायक घटना उघकडीस आली आहे. या घटनेमुळे काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासली गेली आहे. काकाने आपल्याच १५ वर्षांच्या अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ तयार केला. ऐवढेच नाही तर हा व्हिडिओ देखील त्याने व्हायरल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने कपडे घेण्याच्या बहाण्याने पुतणीला मैत्रिणीच्या घरी बोलावत तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. यामुळे पीडित पुतणी ही बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओ देखील त्याने काढला व व्हायरल केला. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना मुंबईच्या वाशिनाका चेंबूर परिसरात घडली आहे. पीडितेवर तिच्या चुलत्याची वाईट नजर होती. यामुळे त्याने कपडे घेण्याच्या बहाण्याने पुतणीला त्याच्या मैत्रिणीच्या घरी बोलावले. यावेळी त्याने तिला शीतपेय प्यायला दिले. यात त्याने गुंगीचे औषध मिसळले होते. हे शीतपेय प्यायल्यावर ही तरुणी बेशुद्ध पडली. या अवस्थेत काकाने तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हा तिच्या चुलत काका आहे. त्याने बलात्कार करतांनाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला कपडे घेऊन देण्याच्या बहाण्याने चेंबूर स्थानकात बोलावलं होतं. यानंतर तिला आपल्या मैत्रिणीच्या घरी घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने तिला गुंगीचं औषध मिसळलेलं शीतपेय पिण्यासाठी दिलं. गुंगीचं औषध प्यायल्याने पीडिता बेशुद्ध झाली होती. यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकंच नाही तर आरोपीने बलात्कार करताना व्हिडीओ शूट केला आणि तो व्हायरल देखील केला. पोलीस हा व्हायरल व्हिडीओ हटवण्याचा प्रयत्न करत आहे.
संबंधित बातम्या