Mumbai Crime News : राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. बदलापूर येथील घनतेनंतर मुंबई, पुणे, अकोला, नागपूर, नाशिक येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या. बदलापूर येथील घटनेचे राज्यभरात पडसाद उमेटले असतांना आता मुंबई येथे पुन्हा एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचं उघडं झालं आहे. ही घटना मानखुर्द येथे घडली असून पीडिता ही काकाच्या वासनेला बळी पडली आहे.
राज्यात बदलापूर घटनेप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. तसेच सरकारला फटकरले देखील. बदलापूर येथे जमाव हिंसक होऊन त्यांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती. मात्र, या घटना घडत असतांनाही मुलींवरील अत्याचार कमी झालेले नाही. मानखुर्दमध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर काकाने बलात्कार केला. या घटनेमुळे काका पुतणीच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे. या घटनेवर नागरिकांनी पुन्हा एकदा संताप केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी ही तिच्या काकाकडे राहते. तिला आई वडील नाहीत. काकाने तिच्यावर बलात्कार केल्यावर काका फरार झाला आहे. पीडित मुलीने तिच्यावर झालेल्या आत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आरोपी काकाचा शोध घेत आहेत.
राज्यात बदलापूर प्रकरणावरून राजकारण सुरू आहे. तर सामान्य नागरिक मुलींवर होणारे अत्याचार थांबवले जावे यासाठी आवाज उठवत आहेत. राज्यातील मुलींच्या सुरक्षेच्या मुद्यावरून रान पेटले असतांना अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बालात्काराच्या घटना पुढे येत आहेत. त्यामुळे आता यावर काय कठोर कारवाई केली जाते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
बदलापूर प्रकरणी आरोपीला २६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी आरोपी अक्षय शिंदेच्या गावातील घराची तोडफोड केली आहे. मात्र, आपला मुलगा निर्दोष असल्याच त्याच्या आई आणि वडिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणी शाळेची देखील चौकशी सुरू आहे. काल पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासले. जर यात शाळा प्रशासन दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.