Girgaon attack : मुंबईतील गिरगावात भररस्त्यात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, सतर्क नागरिकांमुळं बचावला जीव-mumbai crime husband attacked his wife in girgaon due to family dispute ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Girgaon attack : मुंबईतील गिरगावात भररस्त्यात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, सतर्क नागरिकांमुळं बचावला जीव

Girgaon attack : मुंबईतील गिरगावात भररस्त्यात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, सतर्क नागरिकांमुळं बचावला जीव

Aug 06, 2024 08:57 AM IST

girgaon attack news : गिरगावात सकाळच्या सुमारास एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाला होता.या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 गिरगावात भररस्त्यात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला
 गिरगावात भररस्त्यात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला

girgaon attack : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उरण येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर झालेल्या हल्ल्यावेळी आजुबाजूच्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने तिला जीव गमवावा लागला होता. अशीच घटना मुंबईतील गिरगाव येथे घडली आहे. कौटुंबिक वादातून भररस्त्यात पतीने पत्नीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना गिरगाव परिसरात घडली आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने त्याच ब्लेडने स्वतःवरही वार केले. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव बचावला आहे. या घटनेत पतीही जखमी झाला आहे.

सागर बेलोसे असे हल्ला करणाऱ्याचे पत्नीचे नाव असून शितल चव्हाण असे पीडित पत्नीचे नाव आहे. जखमी पती-पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गिरगावातील खाडीलकर रोडवर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला अन् थेट १०० फूट खोल दरीत कोसळली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने शीतल महिनाभरापासून आई-वडिलांकडे राहायला गेली होती.

गिरगावात सकाळच्या सुमारास एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाला होता.या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिला कामावर जात असतानाच हा हल्ला करण्यात आला.पतीने ब्लेडने पत्नीवरजीवघेणा हल्लाकेला. सुदैवाने आजूबाजूच्या तरुणांनी हल्ला करणाऱ्याला पकडून ठेवल्याने महिलेचा जीव वाचला. या घटनेची माहिती तात्काळ व्ही पी रोड पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला.

आरोपीने घरगुती वादातून सोमवारी सकाळच्या सुमारात पत्नीवर हल्ला केला व त्याच ब्लेडने स्वतःचे मनगट कापण्याचा प्रयत्न केला. सागरने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही शितल प्रतिसाद देत नव्हती. यामुळे सोमवारी सकाळी कामावर जात असताना त्याने तिला रस्त्यात गाठले. त्यानंतर त्याने ब्लेडने पत्नीवर हल्ला केला. त्याने पत्नीच्या गळा आणि चेहऱ्यावर वार केले. मात्र आसपासच्या सतर्क नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पत्नीवर हल्ला करून त्याने आपले मनगट कापले.

महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तर बेलोसे याला सरकारी वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले.  दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बेलोसे विरोधात व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.