Mumbai: नववीत शिकणाऱ्या मुलाचा ३ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, मुंबईतील धक्कादायक घटना-mumbai crime 3 year old raped by minor in saki naka accused held ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: नववीत शिकणाऱ्या मुलाचा ३ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai: नववीत शिकणाऱ्या मुलाचा ३ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, मुंबईतील धक्कादायक घटना

Aug 14, 2024 04:17 PM IST

Minor Rapes 3-Year-Old Girl: मुंबईतील साकीनाका येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाने ३ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Mumbai Minor Girl Rape News: मुंबईतील साकीनाका येथे धक्कादायक घटना घडली. इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाने ३ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला आज (१४ ऑगस्ट २०२४) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली.

एएनआय वृत्त संस्थेने साकीनाका पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका परिसरात ३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करणार आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी मुलीचे कुटुंबीय मुंबईत स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी ते सोलापुरात राहत होते. मुलीवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ३ वर्षानंतर आरोपीला अटक

१२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तीन वर्षानंतर अटक केली. रबाळे एमआयडीसी परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने बलात्कार केल्याची घटना सप्टेंबर २०२१ मध्ये घडली होती.

धनंजय लालचंद सरोज या बनावट नावाचा वापर करून आरोपीने अल्पवयीन मुलीचे आई-वडील आणि तिची मोठी बहीण दिवसा कामानिमित्त बाहेर असताना तिच्यावर बलात्कार केला. आपले कृत्य त्यांच्यासमोर उघड होईल या भीतीने तो पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच दिवशी संध्याकाळी तिचे आई-वडील घरी परतले असता अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाची माहिती दिली. त्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या गावी भेट दिली असता तेथे अशा नावाचा एकही व्यक्ती राहत नसल्याचे आढळून आले, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अजय लांडगे यांनी दिली.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाइल बंगळुरू येथे शोधून काढला, मात्र त्याने आपला फोन बंद ठेवला. कनेक्शन मिळवण्यासाठी सादर केलेला कॉल रेकॉर्ड डेटा आणि कागदपत्रांच्या मदतीने पोलिसांना आरोपीचे खरे नाव धनंजय लालचंद पासवान ऊर्फ गानू असल्याचे निष्पन्न झाले.

विभाग