Kirti Vyas Murder Case : ६ वर्षांपूर्वी हत्या; मासिक पाळीतील रक्ताच्या डागाद्वारे आरोपींचा काढला माग, दोघांना जन्मठेप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kirti Vyas Murder Case : ६ वर्षांपूर्वी हत्या; मासिक पाळीतील रक्ताच्या डागाद्वारे आरोपींचा काढला माग, दोघांना जन्मठेप

Kirti Vyas Murder Case : ६ वर्षांपूर्वी हत्या; मासिक पाळीतील रक्ताच्या डागाद्वारे आरोपींचा काढला माग, दोघांना जन्मठेप

May 28, 2024 06:24 PM IST

Kirti Vyas Murder Case: ६ वर्षांपूर्वी हत्या झालेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना अद्याप किर्तीचा मृतदेह किंवा मृतदेहाचे कोणतेही अवशेष सापडले नाहीत. तरी डिजिटल व फॉरेन्सिक पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांना जन्मठेप सुनावले.

किर्ती व्यास हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप
किर्ती व्यास हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप

 Kirti Vyas Murder Case : बी ब्लंटच्या अॅडमीन कीर्ती व्यासची कारमध्ये हत्या करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सिद्धेश ताम्हणकर आणि कविता सिधवानी अशी आरोपींची नावे आहेत. मृतदेह मिळाला नसला तरी सबळ पुराव्याच्या आधारावर जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. सोमवारी न्यायाधीश एम. जी. देशपांडे दोन्ही आरोपींना हत्येप्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यानंतर सिध्देश ताम्हणकर (Siddhesh Tamhankar) आणि कविता सेजवानी (kavita Sahjwani) या दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

कीर्ती व्यास हत्या प्रकरणही शीना बोरा प्रकरणासारखं हाय प्रोफाईल हत्याप्रकरण होतं. त्यामुळे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर, गुन्हे अन्वेषन विभागाचे प्रमुख संजय सक्सेना, सहआयुक्त के. एम. प्रसन्ना हे सातत्याने या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. 

कीर्ती व्यासची १६ मार्च २०१८ रोजी हत्या करण्यात आली होती. अभिनेता फरहान अख्तरची भूतपूर्व पत्नी अधुनाच्या कार्यालयात कीर्ती फायनान्स व्यवस्थापक पदी कार्यरत होती. कीर्ती गायब झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तिचा शोध घेत होते. कीर्तीचे कार्यालयीन सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि कविता सजवानी यांच्यावर तिच्या हत्येचा आरोप होता.

किर्तीचा मृतदेह अद्याप मिळाला नाही -

सिध्देश आणि कविताला कीर्तीची हत्या, अपहरण आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं होतं. २०१८ पासून कीर्ती बेपत्ता झाली होती. कीर्तीचा मृतदेह पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अवधूत चिमलकर यांनी युक्तीवाद केला. सिध्देश आणि कविता यांची आधीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसल्याने त्यांना कठोर शिक्षा देऊ नये अशी विनंती त्यांच्या वकीलामार्फत केली होती. दोघांचे कुटुंबीय त्यांच्यावर अवलंबून असल्याचा मुद्दा बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडला.

६ वर्षांपूर्वी हत्या झालेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना अद्याप किर्तीचा मृतदेह किंवा मृतदेहाचे कोणतेही अवशेष सापडले नाहीत. मात्र गुन्हे अन्वेषन विभागाने कोर्टात काही डिजीटल आणि फॉरेन्सिक पुरावे सादर केले. हे पुरावे पुरेसे असल्याचं म्हणत न्यायालयाने दोन्ही आरोपींना या खून प्रकरणात दोषी घोषित केलं आहे. १६ मार्च २०१८ रोजी किर्ती व्यासचा खून झाला होता. मे २०१८ मध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर तीन महिन्यांनी पोलिसांनी या प्रकरणी चार्जशीट दाखल केली. कविता सजलानी हिला २०२१ मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र सिद्धेश ताम्हणकर अद्याप तुरुंगात आहे.

कविता सजलानीच्या कारमध्ये पोलिसांना रक्ताचे काही डाग सापडले. फॉरेन्सिक तपासणीत आढळले की, डाग किर्तीच्या रक्ताचे (मासिक पाळीत होणारा रक्तस्राव) आहेत. त्यानंतर पोलिसांनी कविताची चौकशी सुरू केली. कविताने सिद्धेश ताम्हणकरचा उल्लेख आल्यावर पोलिसांनी सिद्धेशला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केली.

किर्ती व्यास अंधेरी येथे बी ब्लंट या कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होती. एक बॉलिवूड अभिनेता या कंपनीशी संबंधित आहे. कविता सजलानी आणि सिद्धेश ताम्हणकर हे याच कंपनीत काम करत होते. कविता आणि सिद्धेशचं अफेयर चालू होतं. सिद्धेश कार्यालयात चांगलं काम करत नव्हता. त्यामुळे किर्तीने सिद्धेशला नोटीस बजावली. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर