मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत १५ महिन्यांच्या बाळाची हत्या, लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचं धक्कादायक कृत्य; कारण ऐकून पोलीसही चक्रावले!

मुंबईत १५ महिन्यांच्या बाळाची हत्या, लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचं धक्कादायक कृत्य; कारण ऐकून पोलीसही चक्रावले!

May 26, 2024 05:35 PM IST

Mumbai Couple Kill 15-Months-Old Toddler: मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याने १५ महिन्याच्या बाळाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मुंबईत १५ महिन्याच्या बाळाची हत्या केल्याप्रकरणी एका जोडप्याला अटक करण्यात आली.
मुंबईत १५ महिन्याच्या बाळाची हत्या केल्याप्रकरणी एका जोडप्याला अटक करण्यात आली.

Mumbai Murder: मुंबईतील जोगेश्वरी परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याने १५ महिन्याच्या बाळाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित जोडप्याला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकणी जोगेश्वरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश राणा (वय, २८) आणि रिंकी राणा (वय, २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी मूळचे ओडिशातील रहिवाशी आहेत. रिंकी चार महिन्यांपूर्वी तिला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलासह मुंबईत आली होती. राजेश, रिंकी आणि तिचा दीड वर्षाचा मुलगा अमन जोगेश्वरी येथील बांधकामाच्या ठिकाणी राहत होते. दरम्यान, आरोपींनी २१ मे २०२४ रोजी अमनचे अपहरण झाल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता राजेश यानेच अमनची हत्या करून त्याचा मृतदेह गोरेगाव येथील नाल्यात फेकून दिल्याचे उघड झाले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच हत्येची कुबली

याप्रकरणी पोलिसांनी राजेशची कसून चौकशी केली असता तो म्हणाला की, अमनला खेळायला घेऊन जात असताना तो जमीनीवर पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अमनच्या मृत्युमुळे राजेश घाबरला आणि त्याने घाबरून अमनचा मृतदेह गोरेगाव येथील नाल्यात फेकला. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात अमनचा मृत्यू त्याच्या शरीरावर झालेल्या अनेक जखमांमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी राजेशला खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबूली दिली.

हत्येमागचे कारण

रिंकी पहिल्या पतीपासून अमन जन्माला आला. यामुळे आरोपींना अमनचा तिरस्कार वाटत होता. अमनमुळे आरोपींमध्ये सतत भांडण होत असे. यातून राजेश आणि रिंकीने अमनची हत्या केली, असे पोलीस तपासातून उघड झाले.

वसई: बायकोशी फ्लर्ट करणाऱ्या मित्राची हत्या

यापूर्वी वसईमध्ये बायकोशी प्लर्ट करणाऱ्या मित्राची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी गोविंद खानिया याने खून केल्यानंतर त्याचा मृतदेह वसई पूर्वेकडील साईनाथ नगरमधील डोंगरवार परिसरात फेकून दिला. रमेश नायर (वय ४८) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग