मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईत धावत्या बाईकवर जोडप्याचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल!

Mumbai: मुंबईत धावत्या बाईकवर जोडप्याचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 14, 2024 07:34 PM IST

Mumbai Couple Indecent Stunt On Scooter: मुंबईत जोडप्यांचा धावत्या बाईकवर अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video

Mumbai Couple Romance Viral Video: मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशन रोडवर धावत्या दुचाकीवर रोमान्स करताना एका जोडप्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील जोडप्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारल्याचे दिसत आहे. या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच संबंधित जोडप्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक जोडपे धावत्या बाईकवर एकमेकांना मिठी मारल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी एकमेकांच्या अंगावर शाल घेतली. हा व्हिडिओ रस्त्यातून जाणाऱ्या एका व्यक्तीने काढला. दोघेही हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसत आहे. संबंधित व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर करताना मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा व्हिडिओ पाहून एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, संबंधित जोडप्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करावी. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, अशा जोडप्यांविरोधात पोलीस कारवाई कार करत नाही? रस्त्यावर अनेक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अशा प्रकारची तक्रार नोंदवण्यासाठी कोणता अॅप आहे का, असा प्रश्न एका वापरकर्त्याने विचारला आहे.

धावत्या बाईकवर रोमान्स करणाऱ्या जोडप्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अलीकडेच राजस्थानच्या अजमेर येथील एका जोडप्याचा व्हिडिओ धावत्या बाईकवर रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पोलिसांनी संबंधित जोडप्यांविरोधात कठोर कारवाई करत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याची बाईक जप्त करण्यात आली.

यापूर्वी राजस्थानच्या अजमेरमधील एक जोडप्यांचा दुचाकीवरून रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये या जोडप्याच्या रात्री उशिरा कॉलेज क्रॉसरोडपासून शहरातील नौसर व्हॅलीपर्यंत प्रवास करत असल्याचे दिसत आहे.

WhatsApp channel

विभाग