मुंबईच्या मरिन ड्राईव्ह येथे कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून समुद्रात बुडणाऱ्या एका महिलेचे प्राण वाचवले. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. किरण ठाकरे आणि अनमोल दहिफळे असे पोलीस कॉन्स्टेबल यांची नावे आहेत. त्यांच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे.
मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात पोलीस या महिलेला वाचवत सुरक्षित स्थळी आणत आहेत. तिला रुग्णालयात नेण्यासाठी गाडीत बसवण्यास मदत करण्यापूर्वी इतर पोलिस सदस्य तिची काळजी घेताना दिसत आहेत. "मरीन ड्राइव्हच्या सुंदर महल जंक्शनजवळ बुडण्याच्या घटनेनंतर कर्तव्यावर असलेले अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण ठाकरे आणि पोलीस कॉन्स्टेबल अनमोल दहिफळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून समुद्रात उडी मारून महिलेचे प्राण वाचवले. त्यानंतर मरिन ड्राइव्ह १ मोबाइल व्हॅनने महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी केली असून तिच्या नातेवाइकांना कळविण्यात आले आहे.
काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला साडेसात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ही संख्या वाढतच चालली आहे. या व्हिडिओला तब्बल ४३ हजार लाइक्स मिळाले आहेत, ज्यात अभिनेत्री भूमी पेडणेकरहिचा ही समावेश आहे.
“मी भारतातील जवळजवळ सर्व मोठ्या मेट्रो शहरांमध्ये फिरलो आणि राहिलो आहे. मुंबईत आता सहा वर्षे झाली आहेत. असे शहर कधीच पाहिले नाही आणि इतर कोणत्याही शहरात सुरक्षित वाटले नाही. मुंबई पोलीस हेच देशाचे खरे रत्न आहेत,' असे एका इन्स्टाग्राम युजरने म्हटले आहे. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, “आमच्या मुंबई पोलिसांबद्दल आदर आहे.” "लोक विसरतात की पोलीस देखील माणसे आहेत आणि त्यांची कुटुंबे देखील आहेत. अशा गोष्टींमुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. मुंबई पोलिसांना आशीर्वाद", असे तिसऱ्याने म्हटले आहे.
मुंबई पोलिसांनी आपल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार फॉलोअर्स तयार केले आहेत. विविध विषयांवर जनजागृती करण्यापासून ते पोलिसांचे शौर्य टिपणाऱ्या कथा शेअर करण्यापासून ते व्हायरल ट्रेंडमध्ये सहभागी होण्यापर्यंत त्यांनी सोशल मीडियावर स्वत:ची छाप निर्माण केली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १ हजार ६०० हून अधिक पोस्ट केल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम हँडलवर सुमारे ७.९ लाख फॉलोअर्स आहेत.
संबंधित बातम्या