Dadar Fire Updates: दादरमधील इमारतीला लागलेली आग चार तासानंतर आटोक्यात, कूलिंग ऑपरेशन सुरु
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dadar Fire Updates: दादरमधील इमारतीला लागलेली आग चार तासानंतर आटोक्यात, कूलिंग ऑपरेशन सुरु

Dadar Fire Updates: दादरमधील इमारतीला लागलेली आग चार तासानंतर आटोक्यात, कूलिंग ऑपरेशन सुरु

Updated Jan 27, 2023 10:03 AM IST

Mumbai Fire: मुंबईतील दादर पूर्व भागात गुरुवारी रात्री आठ वाजता लागलेली आग आटोक्यात आली असून सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे.

Dadar Fire
Dadar Fire

Dadar: मुंबईच्या दादर पूर्व भागातील एका रहिवासी इमारतीत लागलेली आग चार तासानंतर आटोक्यात आली आहे. इमारतीच्या ४२व्या मजल्यावर ही आग लागली होती. गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या सध्या कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईतील दादर स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका रहिवाशी इमारतीच्या ४२व्या मजल्यावर गुरूवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच नागरिकांना सुरक्षितरित्या अपार्टमेन्टमधून बाहेर काढून आग विझवण्याचे काम सुरू झाले.त्यानंतर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आग लागली

मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही आगली, असा आरोप भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला आहे. "दादर पूर्व येथील आर ए रेसिडेन्सी इमारतीच्या ४२व्या मजल्यावर रात्री आठच्या सुमारास आग लागली. आग ४२ व्या मजल्यावर असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी अधिक वेळ लागला. कारण, क्रेन तेवढ्या उंचीवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पायऱ्यांवरुन पाईप घेऊन ४२ व्या मजल्यावर जावा लागले. हा महापालिकेचा निष्काळजीपणा आहे. मुंबई महापालिका जर ४४ ते ५५ मजल्यांच्या इमारती बांधायला परवानगी देत असेल तर अग्निशमन दलाला देखील तितक्याच तयारीची गरज आहे. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाकडे आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व तंत्र विकसित करणं आवश्यक आहे." असे कालिदास कोळंबकर म्हणाले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर