मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Crime: गाढ झोपेत असलेल्या मालकिणीसोबत स्वयंपाक्याचं हादरवणारं कृत्य, मुंबईच्या अंधेरीतील घटना!

Crime: गाढ झोपेत असलेल्या मालकिणीसोबत स्वयंपाक्याचं हादरवणारं कृत्य, मुंबईच्या अंधेरीतील घटना!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 20, 2023 04:09 PM IST

Mumbai cook beating owner: मुंबईच्या अंधेरी परिसरात स्वयंपाक्यानं मालकिणीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली.

Mumbai crime news
Mumbai crime news

Mumbai Crime: मुंबईतील अंधेरी परिसरात रविवारी दुपारी स्वयंपाक्यानं मालकिणीला बेदम मारहाण करून विद्युत शॉक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्वयंपाक्याविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठल्या तरी गोष्टीवर पीडित महिला त्याला ओरडली होती, याचाच राग डोक्यात ठेवून आरोपीने तिला बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आरोपी स्वयंपाकी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार सिंह (वय, २५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजकुमार हा गेल्या दोन वर्षांपासून पीडित महिलेच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतो. मात्र, काही दिवसांपूर्वी पीडित महिला कुठल्या तरी कारणांवरून त्याच्यावर भडकली होती. ज्याचा राजकुमारला राग आला. रविवारी दुपारी पीडिता झोपलेली असताना राजकुमार त्याच्याजवळ असलेल्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून घरात शिरला. त्यानंतर राजकुमारने पीडिताला बेदम मारहाण केली आणि विद्युत शॉक दिला.

Pune Crime News : पुण्यात दिवट्या पोराचा प्रताप; वडिलांच्या परस्पर फ्लॅटची कागदपत्रे चोरुन घेतले १ कोटी २० लाखांचे कर्ज

आरोपी राजकुमारने पीडिताचा गळा दाबून तिचे डोके जमीनीवर आपटले. यावेळी पीडित महिलेचा ११ वर्षांचा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपला होता. आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून तो धावत बाहेर आला. मात्र, राजकुमार त्यालाही मारहाण करेल, या भितीने त्याला खोलीतच लपण्यास सांगितले. यानंतर मंगळवारी पीडिताने राजकुमारविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पुणे: चांगलं राहण्याचा सल्ला देणाऱ्या बापाला संपवलं

पुण्यातील विश्रांतीवाडी परिसरात चांगलं राहण्याचा सल्ला देणाऱ्या बापाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय, ५५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय, २०) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण यांनी शिवनाथला वारंवार चांगला राहण्याचा आणि काम करण्याचा सल्ला द्यायचे. यावर संतापलेल्या शिवनाथने सोमवारी मध्यरात्री गाढत झोपेत असलेल्या वडील लक्ष्मण यांच्या छातीत आणि पोटात कात्रीने वार केले. यामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

WhatsApp channel

विभाग