मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

May 20, 2024 01:02 PM IST

Mumbai Constable Death Forensic Report: दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विशाल पवार यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालातून त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे.

पोलीस हवालदार विशाल पवार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? वाचा

मुंबई पोलीस दलातील हवालदार विशाल पवार यांचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे झाला नसल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झाले. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ अंमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांनी विशाल यांना विषारी इंजेक्शन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विषारी इंजेक्शनमुळे पवार यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक करत होते. त्यांच्या मृत्युनंतर २० दिवसानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरात कोणतेही विष नसल्याचे निष्पन्न झाले.

ट्रेंडिंग न्यूज

दादर रेल्वे पोलिसांना प्राप्त झालेला अहवाल ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येणार असून, त्यातून पवार यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पवार यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशाल प्राथमिक वैद्यकीय अहवालात त्यांना कावीळ असूनही घटनेच्या दिवशी म्हणजे २७ एप्रिल रोजी त्यांनी किमान १० ते १२ वेळा मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले आहे. पवार यांनी कोपरी पोलिसांना २७ एप्रिल रोजी खोटा जबाब दिल्याचा शास्त्रीय पुरावा असल्याचे दादर जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्या शरिरात विष आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या रक्ताचा नमुना कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविला होता. शनिवारी आलेल्या अहवालात पवार यांच्या शरिरात कोणतेही विष नसल्याचे स्पष्ट झाले. पवार यांच्या प्रकरणात १ मे २०२४ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता, तर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

दादर जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालात त्यांना कावीळ झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांनी घटनेच्या दिवशी ज्या बार आणि पबमध्ये मद्यपान केले होते, त्या सर्व बार आणि पबचे जबाब नोंदवण्यात आले. तपासात असे समजले की, आणखी मद्यपान करण्यासाठी त्यांनी बारच्या मालकाकडे सोन्याची अंगठी गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

यकृत निकामी झाल्याने किंवा मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे पवार यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र, रासायनिक विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. विशाल हे २७ एप्रिलच्या रात्री लोकलने ठाण्याला जात असताना त्यांचा मोबाइल हँडसेट लुटल्यानंतर त्यांना फटका टोळीच्या सदस्यांनी मारहाण केल्याचा खोटा जबाब त्यांनी कोपरी पोलिसांना दिल्याचे तपासात उघड झाले.

|#+|

कोपरी पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक विसंगती असून २७ एप्रिल रोजी रात्री ११.४० च्या सुमारास पवार दादर येथे असून त्यांनी काही बार आणि रेस्टॉरंटला भेट दिल्याचे तपासात उघड झाले. पवार यांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, या टोळीने त्यांना विषाचे इंजेक्शन दिले आणि जबरदस्तीने त्यांच्या तोंडात आमली द्रव ओतले. त्यानंतर लगेचच तो बेशुद्ध पडला आणि रात्री दोनच्या सुमारास माटुंगा स्थानकात रेंगाळला आणि भानावर आल्यानंतर घरी जाण्यासाठी ठाणे ट्रेनमध्ये चढला.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग