मुंबई काँग्रेसकडून पहिल्यांदाच तृतीयपंथीय सेल स्थापन, सलमा साखरकर यांची अध्यक्षपदी निवड
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई काँग्रेसकडून पहिल्यांदाच तृतीयपंथीय सेल स्थापन, सलमा साखरकर यांची अध्यक्षपदी निवड

मुंबई काँग्रेसकडून पहिल्यांदाच तृतीयपंथीय सेल स्थापन, सलमा साखरकर यांची अध्यक्षपदी निवड

Published Jan 10, 2024 11:31 PM IST

Congress Transgender Community Cell : मुंबई काँग्रेस अंतर्गत पहिल्यांदाच तृतीयपंथीय सेलची स्थापना झाली. या सेलच्या अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Congress Transgender Community Cell
Congress Transgender Community Cell

मुंबई प्रदेश काँग्रेस अंतर्गत पहिल्यांदाच तृतीयपंथीय सेलची स्थापना झाली. या सेलच्या अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या बाबतची बैठक प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई काँग्रेस कार्यालयात पार पडली.

मुंबईतील तृतीयपंथींनी विविध समस्यांसाठी या आधी सातत्याने लढा दिला आहे. आता मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या विविध प्रश्नांना अधिक आक्रमकपणे वाचा फोडतील,असा विश्वास प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

मुंबईत सत्तर हजार तृतीयपंथी आहेत तर संपूर्ण देशात ही संख्या पाच लाख आहे. दिवसेंदिवस अनेक समस्यांना तृतीयपंथींना सामोरे जावे लागते,त्या समस्या सोडवण्यासाठी आज काँग्रेस आपल्या परीने प्रयत्न करत आहे.

काँग्रेस प्रागतिक विचारांचा पक्ष आहे आणि त्या विचारांची पाठराखण करून आज या पदाची नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथी समुदायाला आपली मते मांडण्यासाठी आणि आपले अडथळे दूर करण्यासाठी व्यासपीठ मिळेल, असे प्रा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर