मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Coastal Road : पावसाआधीच मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्याला लागली गळती; दोन महिन्यांपूर्वीच झालंय उद्घाटन!

Mumbai Coastal Road : पावसाआधीच मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्याला लागली गळती; दोन महिन्यांपूर्वीच झालंय उद्घाटन!

May 28, 2024 04:23 PM IST

Mumbai Coastal Road Tunnels Leak: दोन महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यातून पावसळ्यापूर्वीच गळती सुरू झाली.

पावसाळ्याआधीच मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यामधून गळती सुरू झाली आहे.
पावसाळ्याआधीच मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यामधून गळती सुरू झाली आहे.

Mumbai Coastal Road News: पावसाळा सुरू होण्यास अजून काही आठवडे शिल्लक असतानाच मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यांना गळती लागली आहे. सोमवारी सायंकाळी बोगद्यांच्या छतावरून पाणी टपकताना दिसले. तर, ओलसरपणामुळे भिंतींवर अनेक गडद डाग पडले होते. अंधारलेल्या डागांपासून जमिनीपर्यंत ठिबक रेषा तयार झाल्या होत्या. छिद्रांचा परिघ ओलसर दिसले. बोगद्यातून बाहेर पडण्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या मरीन ड्राइव्ह- एंडच्या दिशेने कोस्टल रोडवर पाणी साचले.

ट्रेंडिंग न्यूज

रविवारी सकाळपासून ही गळती सुरू असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंता गिरीश निकम यांनी दिली. “बांधकामाच्या सांध्यातून येणाऱ्या भिंतीत ओलसरपणा आहे. रात्री ११ वाजेपर्यंत वाहतूक सुरू असल्यामुळे तपासणी बाकी असल्याने नेमके कशामुळे बोगद्याला गळती लागली, यामागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.” रविवारी सकाळी ही गळती पहिल्यांदा समोर आल्यानंतर ती थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सोमवारी गळती वाढली.

या बोगद्याच्या बांधकामात गुंतलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ग्राउटिंगचा वापर करून तो वॉटरप्रूफ करण्यात आला आहे, आणखी काही ग्राउटिंगची आवश्यकता असू शकते. परंतु, गळतीची तपासणी होईपर्यंत त्यांनी पुढील निर्णय राखून ठेवला. यापूर्वी १० एप्रिल रोजी हाजी अली कोस्टल रोडच्या पादचारी अंडरपासमध्ये भरतीचे पाणी शिरले होते. यावर पाणी साचू नये म्हणून महानगरपालिकेने काही उपाय शोधले आहेत, असे सांगितले होते.

दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे ११ मार्च २०२४ रोजी उद्घाटन केले. हा देशातील पहिला रस्ता आहे, जो समुद्राच्या आत बांधण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याचे काम बीएमसीने केले आहे. याआधी वरळी ते मरीन ड्राइव्ह अंतर गाठण्यासाठी मुंबईकरांना ४० मिनिटे लागायची. मुंबई कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर प्रवाशी अवघ्या ९ ते १० मिनिटात हे अंतर गाठत आहे. पंरतु, पावसाळ्याच्या दोन आठवडे आधीच मुंबई कोस्टल रोड बोगद्यातून गळती सुरू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग