Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून (११ जुलै २०२४) सुरू होणार आहे. आता मरीन लाईन्स ते वरळी सी लिंक असा थेट नॉन स्टॉप प्रवास शक्य होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मरीन लाइन्स ते हाजियाली हा मार्ग खुला करण्यात आला. तर, पहिल्या टप्प्यात बिंदू माधव चौक वरळी ते मरीन लाईन्स हा कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. तसेच प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी हा टप्पा बंद ठेवला जाणार
तिसऱ्या टप्प्यामुळे हाजीअली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत वाहतूक सुरू झाली. तर उर्वरित शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यात कोस्टल रोड आणि वरळी सी लिंक या दोन प्रकल्पांना जोडण्यात येणार आहे. . हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग हा मार्ग आता ९१ टक्के पूर्ण झाला असून, ११ जुलैपासून नागरिकांसाठी तात्पुरता खुला करण्यात येणार असून, या नवीन मार्गाने सागरी सेतूवर जाता येणार आहे. चौथा टप्पा तीन आठवड्यांत पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे. ज्यामुळे वाहचालकांना मरीन लाइन्स ते वांद्रे आणि वांद्रे ते मरीन लाइन्सचे अंतर अगदी कमी वेळेत गाठता येईल
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे कार्यान्वित केलेला हा प्रकल्प,धर्मवीर स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण), शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सी लिंक) पर्यंत पसरलेला आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीचे निराकरण करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १० जून रोजी कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ जून रोजी दुसरा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. बिंदुमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राईव्ह हा ९.२५ किलोमीटर लांबीचा दक्षिण कालवा मार्ग दक्षिणेकडील प्रवासासाठी खुला करण्यात आला. त्यानंतर, मरीन ड्राइव्ह ते हाजी अली मार्गे लोटस जंक्शन असा अंदाजे ६.२५ किलोमीटरचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला