मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे- फडणवीसांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; खराब हवामानामुळे जामनेर दौरा रद्द

शिंदे- फडणवीसांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; खराब हवामानामुळे जामनेर दौरा रद्द

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 30, 2023 01:21 PM IST

Eknath Shinde- Devendra Fadnavis: खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath Shinde

Eknath Shinde and Devendra Fadnavis Jamner, Jalgaon Tour: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शासकीय विमानातून जामनेर दौऱ्यासाठी रवाना झाले होते. परंतु, खराब हवामानामुळे विमान पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आले.

जळगावच्या जामनेरमधील गोद्री येथे गेल्या सहा दिवसांपासून कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळ्यात उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या शासकीय विमानातून मुंबईहून जामनेर दौऱ्यासाठी रवाना झाले. परंतु, खराब हवामानामुळे विमान पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाचे कालिना एअरपोर्टच्या गेट क्रमांक सहावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दरम्यान, शिंदे-फडणीवीसांचा जामनेर दौरा रद्द झाल्याची चर्चा असून त्यांचा ताफा वर्षा बंगल्याकडे निघाल्याची माहिती मिळत आहे.

जळगाव दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बंजारा समाजाच्या संताच्या मंदिराचं उद्घाटनही करण्यात येणार होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ आणि योग गुर रामदेव बाबाही उपस्थिती दर्शवणार आहेत. यामुळे एकनाथ शिंदे आणि फडवणीस यांच्या जळगाव दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडणार आहे.

IPL_Entry_Point