Konkan Railway Special Express Trains : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची लगबग दरवर्षी असते. या निमित्त दरवर्षी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचे देखील नियोजन केले जात असते. यावर्षी देखील गणेशोत्सव काळात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तब्बल २०२ विशेष गाड्या कोकणासाठी गणेशोत्सव काळात सोडल्या जाणार आहेत. या मुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी प्रामुख्याने दोन दिवसांआधी कोकणवासीय नागरिक आपल्या घरी जात असतात. कोकणातील नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. हे सर्व गणेशोत्सव काळात गावी जात असतात. गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात २०२ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
सीएसएमटी ते सावंतवाडी १८ फेऱ्या तर सावंतवाडी ते सीएसएमटी दरम्यान रेल्वेच्या १८ फेऱ्या होणार आहेत. तर सीएसएमटी ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते सीएसएमटी प्रत्येकी १८ विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. दिवा-चिपळूण आणि चिपळूण-दिवा प्रत्येकी १८ फेऱ्या, तर सीएसएमटी ते कुडाळ आणि कुडाळ ते सीएसएमटी प्रत्येकी तीन फेऱ्या होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आणि कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी १८ फेऱ्या होणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी १८ फेऱ्या सोडण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आणि कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान प्रत्येकी ८ फेऱ्या या प्रमाणे २०२ फेऱ्या विविध गाड्यांच्या केल्या जाणार आहेत.
स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ पर्यंत दररोज रात्री ००:२० वाजता सुटेल व त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाड़ी येथे पोहोचेल.
०११५२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज १५.१० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
मुंबई सीएसएमटी - रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या) ०११५३. स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. ०११५४ स्पेशल रत्नागिरीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणी त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
तर ०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
०११७१ स्पेशल एलटीटी मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ०८:२० वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी येथे०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत रोज रात्री २२:२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.
दिवा चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या) ०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत सकाळी ०७:१५ वाजता सुटेल व त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. ०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.
०११८६ स्पेशल कुडाळवरून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
एलटीटी - कुडाळ स्पेशल (१६ सेवा) - ०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) पर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
संबंधित बातम्या