मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  झोपेत चालण्याच्या आजारानं घेतला जीव! मुंबईत १९ वर्षीय तरुणाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

झोपेत चालण्याच्या आजारानं घेतला जीव! मुंबईत १९ वर्षीय तरुणाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

Jul 01, 2024 04:01 PM IST

Byculla boy died due to Sleep disorder: मुंबईत भायखळा येथे झोपेत चालण्याच्या सवयीमुळे एका तरुणाचा सहाव्या मजल्यावरून पडून खाली पडून मृत्यू झाला.

झोपेत चालण्याच्या रोगानं जीव घेतला! मुंबईत १० वर्षीय तरुणाचा थेट सहाव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू
झोपेत चालण्याच्या रोगानं जीव घेतला! मुंबईत १० वर्षीय तरुणाचा थेट सहाव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू

Mumbai Crime News: झोपेत चालण्याची अनेकांना सवय असते. हा एक रोग आहे. मुंबईत याच झोपेत चालण्याच्या सवयीने एका तरुणाचा जीव घेतला आहे. झोपेत चालत असतांना एका १९ वर्षीय तरुणाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना भायखळा येथे घडली आहे.

मुस्तफा इब्राहिम चुनावाला असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. इब्राहीम हा झोपेत चालत असतांना सहाव्या मजल्यावरुन खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जवळील सेफी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत माझगाव येथे टॉवर नंबर 1, नेसबीट रोड येथे राहणाऱ्या चुनावाला यांच्या इब्राहीम (वय १९) या मुलाला झोपेत चालण्याची सवय होती. ३० जूनच्या रात्री इब्राहीम हा झोपला होता. मध्यरात्री तो झोपेतच उठला आणि चालायला लागला. यावेळी तो सहाव्या मजल्यावरून थेट खाली कोसळला. यात इब्राहीम हा गंभीर जखमी झाला. त्याला घरच्यांनी तातडीने सेफी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

उपचार करूनही त्रास कायम 

मुस्तफा इब्राहिम चुनावाला याला झोपेत चालण्याची सवय आहे. त्याला त्यांनी दवाखान्यात देखील नेले होते. मात्र, तयाकहा त्रास कायम होता. रविवारी रात्री  मुस्तफा हा झोपेत चालत निघाला. यावेळी इतर कुटुंबीय देखील झोपेत होते. इब्राहीम हा चालत जात असताना इमारतीच्या  सहाव्यामजल्यावरून थेट तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचरासाठी सेफी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, तयाकहा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.   

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर