bhendi bazaar suicide : मुंबईत व्यावसायिकानं उचललं टोकाचं पाऊल! ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसमोर डोक्यात गोळी मारून संपवलं जीवन-mumbai businessman troubled by increasing debt end his life by shot himself ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  bhendi bazaar suicide : मुंबईत व्यावसायिकानं उचललं टोकाचं पाऊल! ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसमोर डोक्यात गोळी मारून संपवलं जीवन

bhendi bazaar suicide : मुंबईत व्यावसायिकानं उचललं टोकाचं पाऊल! ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसमोर डोक्यात गोळी मारून संपवलं जीवन

Aug 17, 2024 03:20 PM IST

Mumbai bhendi bazaar suicide : मुंबईतील भेंडी बाजार परीसात एका व्यावसायिकाने कर्जबारी झाल्याने टोकाचं पाऊल उचलतं जीवन संपवलं आहे.

मुंबईत व्यावसायिकानं उचललं टोकाचं पाऊल! ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसमोर डोक्यात गोळी मारून संपवलं जीवन
मुंबईत व्यावसायिकानं उचललं टोकाचं पाऊल! ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसमोर डोक्यात गोळी मारून संपवलं जीवन

Mumbai bhendi bazaar suicide : मुंबईत भेंडी बाजार येथे कर्जबारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. त्याने स्वत:च्या ऑफिसमध्ये कर्मचारी असतांना केबिनमध्ये स्वत:वर गोळी झाडत जीवन संपवलं. ही घटना शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

इकबाल मोहम्मद सिवानी (वय ५२), असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी जेजे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार इकबाल मोहम्मद सिवानी हे व्यापारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्यापारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. शुक्रवारी रात्री जवळपास ८ च्या सुमारास ते त्यांच्या मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील अमीन बिल्डिंगमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये बसले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या वेळी त्यांच्या ऑफिसमधील इतर कर्मचारी देखील उपस्थित होते. ही माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इकबाल हे गेल्या काही दिवसांनपासून आर्थिक अडचणीत होते. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. तसेच त्यांना त्यांच्या व्यवसायात देखील मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी शुक्रवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, पोलिस या प्रकरणी दुसरे काही कारण आहे का ? याचा देखील तपास करत आहेत. पोलिसांनी बंदूक जप्त केली आहे. तसेच मृतदेह हा पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

या पूर्वी देखील मुंबईत एका व्यावसायिकाने कर्जामुळे आत्महत्या केली होती. श्रीनिवास असे या व्यावसायिकाचे नाव होते. त्याने अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्या केली होती. यानंतर देखील एका व्यावसायिकाने कर्जबाजारी पणातून टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं होतं. मुंबईत या घटना वाढल्या असून या बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक करा तसेच तणावात असतांना मित्रांशी किवा समुपदेशकाशी संवाद साधावा असे तज्ञांचे म्हणणे आहे.

विभाग