मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट, रेल्वेमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले..

Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट, रेल्वेमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 23, 2024 11:40 PM IST

Bullet Train Update : अश्विनी वैष्णवयांनी म्हटले की,मुंबईआणि अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी मार्गावरील सूरत-बिलिमोराटप्प्याचे लोकार्पण जुलै-ऑगस्ट २०२६ पर्यंत होऊ शकते.

bullet train
bullet train

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी बुलेट ट्रेन प्रकल्पावरून तत्कालीन  उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, जर ठाकरे सरकारने परवानग्या तत्काळ दिल्या असत्या तर देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात आणखी प्रगती झाली असती. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी १० दिवसातच प्रकल्पासाठी सर्व परवानग्या दिल्या असल्याचे वैष्णव म्हणाले.

प्रकल्पाच्या कामाची पाहणी करताना पत्रकारांशी संवाद साधताना अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी मार्गावरील सूरत-बिलिमोरा टप्प्याचे लोकार्पण जुलै-ऑगस्ट २०२६ पर्यंत होऊ शकते.  

मुंबई आणि अहमदाबाद मार्गावरील पहिला टप्पा २०२६ पर्यंत कार्यान्वित  झाल्यानंतर एकामागून एक अन्य टप्पे सुरू करण्यात येतील. बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये 'मर्यादित थांबे' आणि 'सर्व थांबे' अशी सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. मर्यादित थांब्यांसह बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण करू शकेल. तर, इतर सेवांमध्ये हेच अंतर सुमारे २ तास ४५ मिनिटांत कापले जाऊ शकेल. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत १२ स्थानके असतील. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) यांच्या माध्यमातून अंमलबजावणी केली जात आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. 

IPL_Entry_Point