मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai News: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळली! दोन महिलांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू

Mumbai News: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळली! दोन महिलांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू

Jun 15, 2024 07:06 AM IST

Mumbai Chawl Wall Collapsed : मुंबईच्या वडाळा येथे अँटॉप हिल (Wadala Antop Hill) येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका चाळीची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. ढीगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची माहिती आहे.

मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळली! दोन महिलांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू
मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळली! दोन महिलांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू

Mumbai Chawl Wall Collapsed : मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. वडाळा येथील अँटॉप हिल कमला नगरमध्ये एक तीन मजली चाळीची भिंत कोसळली असून या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ढीगाऱ्यात काही जण अडकल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने बचाव कार्य राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शोभादेवी मौर्य (वय ४५) व झाकिरूनिसा शेख (वय ५०) अशी दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. या दोघींना उपचारासाठी दवाखान्यात नेत असतांना सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईत काल पासून पावसाचा जोर वाढला आहे. काही भागात मोठा पाऊस झाला. दरम्यान, या पावसामुळे वडाळा येथील अँटॉप हिल विजयनगर येथील पंजा गल्लीतील एका तीन मजली इमारतीची मोठी भिंत अचानक कोसळली. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भिंत कोसळून ही दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे.

तीन मजली इमारतीची भिंत कोसळली

मुंबईत सध्या जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अँटॉप हिल विजयनगर येथील पंजा गल्लीतील तीन मजली इमारतिचा दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील एका भिंतीचा मोठा भाग कोसळला. तर काही भाग हा अडकून पाडला होता.

घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्य राबवले. या घटनेमुळे मुंबईतील जुन्या घरांचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने अशा घरांचा सर्वे करून मोठी दुर्घटना होण्यापूर्वी पावले उचलावी असे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी देखील अशाच काही घटणामध्ये काही नागरिकांचा जीव गेला होता.

WhatsApp channel
विभाग