Mumbai Boat Accident News Marathi : मुलाच्या उपचारासाठी अहीरे कुटुंबं मुंबईत आलं होतं. उपचार झल्यावर मोकळ्या वेळात मुलाची बोटीत बसण्याची हाऊस पूर्ण करण्यासाठी अहिरे दाम्पत्य मुलासह एलिफंटा येथे जाणाऱ्या बोटीत बसले. तर सासरे हे सामान सांभाळत हे किनाऱ्याजवळ थांबले. आपली मुलगी, नातू आणि जावई कधी येईल ? त्यांचा फिरण्याचा अनुभव कधी सांगतील या आशेने वाट पाहत थांबलेले गोविंद अहिरे यांचं काही क्षणात जग उजाडलं. नौदलाच्या बोटीने धडक देऊन झालेल्या अपघातात त्यांचा जावई, मुलगी आणि नातू या तिघांचा मृत्यू झाला. त्याचे मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला.
मूळचे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील राकेश रहिवासी आहे. त्याच्या नानाजी अहिरे व रत्नाबाई अहिरे या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वयोवृद्ध झालेल्या या दांपत्याचा राकेश हा एकुलता एक मुलगा. मुलाच्या उपचारासाठी राकेश त्याची पत्नी हर्षदा व निदेश हे उपचारासाठी मुंबईला गेले होते.
नानाजी अहिरे हे त्यांच्या मुलगा राकेश (वय ३४), सून हर्षदा (वय ३१) आणि नातू निदेश (वय ७) यांच्यासह मुंबईत उरण येथे एका दवाखान्यात उपचार घेण्यासाठी बुधवारी आले होते. रात्री उरण येथील रूग्णालयात उपचार घेतल्यावर दुपारी त्यांनी मुंबई फिरायचं ठरवलं होतं. यानंतर बुधवारी संध्याकाळी ६.३५ च्या गाडीने ते परत नाशिकला जाणार होते. राकेश अहिरे यांनी दुपारच्या मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्याचा प्लॅन केला, मात्र, त्यांचा प्लॅन त्यांचा आयुष्याचा अखेरचा ठरला.
उपचार केल्यावर मुलाची बोटीत बसण्याची हौस पूर्ण करण्यासाठी हे कुटुंब गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचले. त्यांनी दुपारी ३ वाजता एलिफंटा येथे जाण्याचे ठरवले. त्यांनी सासरे विलास गोविंद यांना देखील त्यांनी सोबत चालण्याचा आग्रह केला. मात्र, ते आले नाही. गोविंद हे गेटवे ऑफ इंडिया येथे त्यांच्या बॅग जवळ बसून होते. दरम्यान, राकेश, हर्षदा व निदेश हे तिघेही बोटीने गेले. मात्र, परत येत असतांना काळाने त्यांच्यावर घाला घातला. नौदलाच्या बोटीने त्यांच्या बोटीला धडक दिल्याने त्यांची बोट बुडाली. व तिघांचा मृत्यू झाला. हा घटनाक्रम सांगताना राकेश आहिरे यांचे सासरे गोविंड यांना अश्रू अनावर झाले.
चाळीस वर्षांपासून नाशिकचा पिंपळगाव बसवंत येथे बांधकाम साइटवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नानाजी आणि रत्नाबाई अहिरे यांना राकेश हा एकुलता एक मुलगा होता. तो सोमवारी सासऱ्यासह उपचारासाठी आईला व मुलाला घेऊन मुंबईला गेले.
घटनेच्या काही तास अगोदर संध्याकाळी घरी येण्यापूर्वी जेवणाला काय बनवायचे, असे सांगून शेवटचं बोलणं झाल्याच वडील नानाजी अहिरे यांनी सांगितले. तर आईने नातवाचं नाव घेताच टाहो फोडला, एकुलता एक मुलगा आणि एकुलता एक नातू या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याने अहिरे कुटुंबावर दुख:च डोंगर कोसळला आहे.
संबंधित बातम्या