Mumbai BMW crash: ''माझी आई मला परत करा, ती कधी येईल? आरोपी मिहीर शहाला फाशी द्या, मृत महिलेच्या लेकीचा टाहो, Video
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai BMW crash: ''माझी आई मला परत करा, ती कधी येईल? आरोपी मिहीर शहाला फाशी द्या, मृत महिलेच्या लेकीचा टाहो, Video

Mumbai BMW crash: ''माझी आई मला परत करा, ती कधी येईल? आरोपी मिहीर शहाला फाशी द्या, मृत महिलेच्या लेकीचा टाहो, Video

Jul 09, 2024 09:02 PM IST

Mumbai BMW crash : शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा रविवारी पहाटे साडेपाच च्या सुमारास बीएमडब्ल्यू कार चालवत असताना ४५ वर्षीय महिला आणि तिच्या पतीला धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

मृत महिलेच्या मुलीची आईसाठी हार्त हाक
मृत महिलेच्या मुलीची आईसाठी हार्त हाक

मुंबईतील वरळी परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यूने चिरडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांनी अटक करण्यात आलेला आरोपी मिहीर शहा याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शहा याला पोलिसांनी मंगळवारी शहापूर येथून अटक केली. पोलिसांनी मिहीरचे वडील, आई आणि बहिणीसह शहा कुटुंबीयांना मदत करणाऱ्या १२ जणांना ताब्यात घेतलं आहे.

त्यातच मृत कावेरी नाखवा यांच्या मुलीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती म्हणते की, मी रडलेलं माझ्या आईला आवडणार नाही. पण मी प्रयत्न करुनही डोळ्यातील अश्रू रोखू शकत नाही. माझी आई माझं सर्वस्व होती, मला माझी आई परत हवीय, कधी परत येईल माझी आई?, अशी भावनिक आर्त हाक तिने दिली आहे.


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व बिल्डर राजेश शहा यांचे चिरंजीव मिहीर शहा याने रविवारी पहाटे साडेपाच च्या सुमारास भरधाव कार चालवून ४५ वर्षीय महिला आणि तिच्या पतीला उडवले होते. मुंबई पोलिसांनी मंगळवारी त्याला अटक केली. या धडकेनंतर कारने कावेरी यांना १०० मीटरपर्यंत फरफटत नेले होते. गंभीर जखमी झालेल्या कावेरी नाखवा यांना वेळीच मदत मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला.



मृत महिलेची मुलगी अमृता म्हणाली की, माझ्या आईला न्याय मिळाला पाहिजे. त्याला (मिहीर शहा) फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या आईला खूप वेदना होत होत्या, मी तिला माझ्या डोळ्यांनी रुग्णालयात पाहिलं आहे.
Mumbai BMW Crash : शिवसेना नेते राजेश शहा यांना जामीन मंजूर,

कावेरी नाखवा यांचे पती दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला होता. तीन दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात आली, याचा अर्थ काय? जर तो नशेत नव्हता, ड्रग्ज घेतला नसता तर तो लपून का बसला?... तीन दिवस तो फरार का होता? वाटेतच गाडी सोडून नंबर प्लेट फोडून पळून गेला, असे कावेरीचे पती म्हणाले.

आता ३ दिवसांनंतर त्याच्या शरीरात अल्कोहोलचे अंश राहणार नाहीत आणि त्याच्यासोबत २० वकील असतील. आम्ही गरीब आहोत, आम्हाला न्याय कोण देणार? आज तो तुरुंगात गेला, परवा त्याला न्यायालयात हजर केले जाईल आणि त्याला जामीन मिळेल. हे प्रकरण सुरूच राहील आणि सर्व काही थंड होईल, असे प्रदीप नाखवा म्हणाले.



आम्ही काय करणार? पैसे आणि वकिलाची व्यवस्था कुठून करणार? सरकारमधील नेते काहीच करणार नाहीत, हा त्यांच्या नेत्याचाच मुलगा आहे. तो एक मोठा माणूस आहे जो कोणालाही विकत घेऊ शकतो... आमच्या बाजूने कोण आहे? फडणवीस किंवा शिंदे आमच्या घरी आले होते का, काय झाले हे जाणून घेण्यासाठी? अजित पवार आले का? असा भावूक सवालही मृत महिलेच्या पतीने केला आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर