Mumbai BMW Crash : शिवसेना नेते राजेश शहा यांना जामीन मंजूर, आरोपी मुलगा मिहिर शहा अजूनही फरार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai BMW Crash : शिवसेना नेते राजेश शहा यांना जामीन मंजूर, आरोपी मुलगा मिहिर शहा अजूनही फरार

Mumbai BMW Crash : शिवसेना नेते राजेश शहा यांना जामीन मंजूर, आरोपी मुलगा मिहिर शहा अजूनही फरार

Jul 08, 2024 07:57 PM IST

Mumbai BMW Crash : घटनेपूर्वी मिहीर शाह मित्रांसोबत जुहू येथील एका पबमध्ये पार्टी करत होता. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचे चिरंजीव आहेत.

अपघातग्रस्त  बीएमडब्ल्यू कार
अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कार (PTI)

मुंबईतील बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी राजेश शाह यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी करताना स्थानिक शिवडी कोर्टाने शिवसेना (शिंदे गट) नेत्याला जामीन मंजूर केला आहे. रिपोर्टनुसार न्यायालयाने १५ हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. राजेश शाह आरोपी मिहिर शाह यांचे वडील आहेत. २४ वर्षाचे मिहिर यांनी रविवारी सकाळी बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला धडक दिली होती.यात जखमी झालेल्या ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता तर जखमी पती प्रदीप यांच्यावर उपचार सुरू आहे.

दादर शिवडी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने आरोपी मिहीर शाहचे वडील आणि शिवसेना नेते राजेश शहा यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

यापूर्वी याच न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या वडिलांनी तात्काळ जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा ड्रायव्हर राजरुषी बिडावत याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरळीतील हिट अँड रन घटनेत सहभागी असलेल्या मिहीर शाहला घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील वरळी भागात रविवारी सकाळी बीएमडब्ल्यूने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका नेत्याचा मुलगा मिहीर शहा चालवत होता. शहा आणि बिदावत मरीन ड्राइव्ह येथील लाँग ड्राइव्हवरून घरी परतत होते.

अपघातानंतर वडिलांनी मिहीर शहा यांना अनेक वेळा फोन केले

वरळी पोलिसांनी सोमवारी सांगितले की, हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचे वडील राजेश शहा यांनी अपघातानंतर आपल्या २४ वर्षीय मुलाला अनेक फोन केले. या घटनेपूर्वी मिहीर मित्रांसोबत जुहू येथील एका पबमध्ये पार्टी करत होता. पोलिसांनी त्या रात्री त्याच्यासोबत असलेल्या तीन मित्रांचे जबाब घेतले आहेत.

वरळीतील डॉ. अॅनी बेझंट रोडवर कारने स्कूटरला धडक दिल्यानंतर फरार झालेल्या मिहीर शहाचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी १४ पथके तयार केली आहेत. सध्या फरार असलेल्या मिहीरसाठी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरी नाखवा (४५) या पती प्रदीपसोबत अॅनी बेझंट रोडवर जात असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास एका लक्झरी कारने त्यांना उडवले. कावेरी रस्त्यावर पडली आणि रुग्णालयात पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या पतीवर उपचार करून नंतर डिस्चार्ज देण्यात आला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर