Mihir Shah: कोण आहे मिहिर शाह? ज्यानं महिलेला बीएमडब्लूनं उडवलं, जाणून घ्या आत्तापर्यंतची सर्व माहिती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mihir Shah: कोण आहे मिहिर शाह? ज्यानं महिलेला बीएमडब्लूनं उडवलं, जाणून घ्या आत्तापर्यंतची सर्व माहिती

Mihir Shah: कोण आहे मिहिर शाह? ज्यानं महिलेला बीएमडब्लूनं उडवलं, जाणून घ्या आत्तापर्यंतची सर्व माहिती

Updated Jul 07, 2024 09:52 PM IST

Who Is Mihir Shah: मुंबईत बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मुंबई बीएमडब्लू कारने महिलेला उडवणारा मिहीर शहा आहे तरी कोण?
मुंबई बीएमडब्लू कारने महिलेला उडवणारा मिहीर शहा आहे तरी कोण?

Mumbai BMW Hit-And-Run Case: मुंबईतील वरळी परिसरात रविवारी सकाळी बीएमडब्ल्यूच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. ही कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एका नेत्याचा मुलगा मिहीर शहा चालवत होता. दरम्यान, मिहीर शहा कोण आहे, याबाबत माहिती जाणून घेऊयात.

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरी नाखवा (वय, ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. नाखवा या रविवारी पहाटे आपल्या पतीसह जात असताना बीएमडब्लू कारने नाखवा यांना उडवले. यानंतर नाखवा यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर, नाखवा यांच्या पतीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

कोण आहे मिहीर शाह?

मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर शहा हा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) राजकारणी राजेश शाह यांचा मुलगा आहे. घटनेच्या वेळी मिहीर शाह आणि राजर्षी बिदावर हे दोघे बीएमडब्ल्यू कारमध्ये होते. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, घटनेच्या वेळी मिहीर शाहा कार चालवत होता. परंतु, सध्या तो बेपत्ता आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शाह आणि बिदावर मरीन ड्राइव्ह येथील लाँग ड्राइव्हवरून घरी परतत होते. यावेळी दोघांनी मद्यपान केले होते की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यांची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने गोळा करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू

कावेरी नाखवा यांच्या पती प्रदीप यांच्या जबाबावरून बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १०५, २८१, १२५ (ब), २३८, ३२४ (४), १८४, १३४ (अ), १३४ (ब) आणि १८७ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी बीएमडब्ल्यू दुर्घटनेदरम्यान पुणे बीएमडब्ल्यू जप्त करण्यात आली असून पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे. याचा तपास सुरू आहे. मिहीर शहा सध्या फरार असून त्याचे वडील राजेश शहा यांची चौकशी सुरू आहे. घटनेच्या वेळी कारमध्ये असलेले राजर्षी राजेंद्रसिंह बिडावत यांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर