Mumbai Water News: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. येत्या ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी शहरातील अनेक भागांत ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिकेडून स्पष्ट करण्यात आले. या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
तानसा पूर्व आणि पश्चिमेकडील १८०० व्यासाची जलवाहिनी काढण्यात येणार आहे, त्याऐवजी २४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम बृहन्मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या बुधवारी (५ फेब्रुवारी २०२५) आणि गुरुवारी (६ फेब्रुवारी २०२५) मुंबई शहरातील एस (भांडुप), एल (कुर्ला), के पूर्व (अंधेरी पूर्व), एच पूर्व (वांद्रे पूर्व) आणि जी उत्तर (सायन, माटुंगा) विभागासह काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यातय येणार आहे. दरम्यान, ही पाणी कपात ५ फेब्रुवारी सकाळी ११ वाजल्यापासून ते ६ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल.
एस विभाग: श्रीरामपाडा, खिंडीपाडा, तुळशेटपाडा, मिलिंद नगर, शिवाजी नगर, मारोडा टेकडी, गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, पासपोली गाव, तानाजीवाडी उडांचन केंद्र, मोरारजी नगर, सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी, टेंभीपाडा, रमाबाई नगर, साई हिल भांडुप जलाशय, टेंभीपाडा, गावदेवी मार्ग, दत्त मंदिर मार्ग, सोनापूर जंक्शन ते मंगतराम पेट्रोल पंप, एलबीएस मार्ग, प्रताप नगर मार्ग, फुले नगर टेकडी आणि इतर.
एल विभाग: काजूपाडा, कपाडिया नगर, न्यू म्हाडा कॉलनी, गफूर खान इस्टेट, पाईप लाईन मार्ग, एलबीएस मार्ग (पूर्व आणि पश्चिम), क्रांती नगर, संभाजी चौक, रामदास चौक, अण्णा सागर मार्ग, ९० फूट रोड, कुर्ला - अंधेरी मार्ग, जरीमारी, घाटकोपर - अंधेरी लिंक रोड, साकी विहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग आणि इतर.
जी उत्तर विभाग: धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जास्मिन मिल मार्ग, माहिम फाटक, ए. के. जी. नगर, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कया मार्ग.
के पूर्व विभाग: ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नागा, सहार गाव, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीप्झ- एमआयडीसी, रोड क्र: १ ते २३, माहेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग कॉलनी, चरतसिंग कॉलनी, मुकुंद हॉस्पिटल, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, विमानतळ रोड परिसर, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर रोड, जे. बी. नगर, पी अँड टी कॉलनी आणि इतर.
संबंधित बातम्या