Mumbai News: दोन कोटींची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एनसीबीकडून मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला आज (गुरुवारी, १९ डिसेंबर २०२४) अटक करण्यात आली. मंदार तारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो अंधेरी पूर्व येथे पालिकेच्या के ईस्ट वार्ड येथे कार्यरत होता. एनसीबीने ७ ऑगस्ट २०२४ रोजी दोन जणांना ७५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तारी यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर एसीबीने त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तारी यांनी ऑगस्ट महिन्यात एका विकासकाकडून दोन कोटींची लाच मागितली होती, ज्याने चार मजली इमारतीत दोन बेकायदेशी मजले उभारले होते. त्याबदल्यात तारी यांनी संबंधित विकासकाला कारवाई न करण्याचे व भविष्यात भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम संरक्षित करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. पण विकासकाला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने तारी यांच्याविरोधात एनसीबीकडे तक्रार दाखल केली. यानंतर एनसीबीने सापळा रचून तारी यांच्यासह आणखी एकाला अटक केली. यानंतर तारी यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, उच्च न्यायालयाने तारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने एनसीबीने आज त्यांना अटक केली.
सीबीआयने ५ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या ५० लाख रुपयांच्या कथित लाचप्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून केंद्रीय वस्तू व सेवा कराच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि भारतीय महसूल सेवेतील एक अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त आणि तीन अधीक्षकांना गेल्या महिन्यात अटक केली. दीपक शर्मा, राहुल कुमार, बिजेंद्र जनावा, निखिल अग्रवाल आणि नितीन गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील एका व्यावसायिकाने फार्मास्युटिकल ट्रेडिंग कंपनीकडे दिलेल्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. सीजीएसटीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना अटक न करण्याच्या बदल्यात ८० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ही रक्कम ६० लाख रुपये करण्यात आली. अखेर ५० लाख रुपये देण्यात आले. मुंबईतील विशेष न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव कुमार यांची जामिनावर सुटका केली. तर, अन्य चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कुमारला दिब्रुगडमध्ये अटक करण्यात आली होती. आसाममधील न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर सीबीआयने त्याला मुंबईत आणून या प्रकरणातील भूमिकेशी संबंधित आरोपांबाबत चौकशी केली.
संबंधित बातम्या