Mumbai News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली. मुंबई महानगरपालिका अनधिकृत स्टॉलवर कारवाई करणार आहे. पुढील आठवड्यापासून रस्त्यावरील चायनीज फूड आणि अनधिकृत स्टॉलविरोधात कारवाई केली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक उद्यापासून तपासणी करणार आहे. अनधिकृत स्टॉल्समुळे पादचाऱ्यांन चालायला त्रास होत असून वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे विशेष पथक मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाहणी करणार आहे. मुंबईत संध्याकाळी ६ ते रात्री ११.०० वाजेपर्यंत कारवाई केली जाणार आहे. या कालावधीत रस्त्यावरील अनधिकृत स्टॉलची संख्या सकाळच्या तुलनेत जास्त आहे, यात खाद्यपदार्थांची विक्री करणारे स्टॉल अधिक असतात. या स्टॉलमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होत आहेत. ज्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना गॅस सिलिंडरचा वापर करण्यासाठी बंदी घातली. मात्र, तरीही अनेक ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवून रस्त्यावर स्टॉल लावले जात आहे. रस्त्याच्या बाजूला अन्न शिवजणे आणि त्या अन्नाची विक्री करणे, हे कायद्याचे उल्लंघन आहे. रस्त्यावर शिजवले जाणाऱ्या खाद्यपदार्थ खाऊन आजार वाढण्याचा धोका असतो. यामुळे मुंबई महानगरपालिकेने विशेष पथक नेमण्यात आले आहे, जे रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनधिकृत स्टॉलविरोधात कारवाई करणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत विक्रेत्यांचे फूड ट्रक, गॅस सिलिंडर आणि इतर उपकरणे जप्त केली जातील. या वस्तू माटुंगा येथील एफ उत्तर विभागातील गोदामात ठेवल्या जातील. दंड भरल्यानंतरच विक्रेत्यांना त्यांच्या वस्तू परत केल्या जातील. २०२१ मध्ये ११ हजारांहून अधिक गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले होते. यावर्षी मुंबई महानगर पालिका किती जणांवर कारवाई करेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या