मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 17, 2024 07:21 PM IST

Mumbai Water Supply: मुंबईत येत्या २२ तारखेला के पूर्व, के पश्चिम आणि पी दक्षिण वॉर्डांमध्ये १६ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

BMC: मुंबई महानगरपालिकेने के पूर्व, के पश्चिम आणि पी दक्षिण विभागात राहणाऱ्या नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. येत्या २२ आणि २३ तारखेला मुख्य जलवाहिनी जोडण्याचे जुन्या खराब झालेल्या जलवाहिन्या काढून टाकण्याचे मुंबई महानगरपालिकेने काम हाती घेतले. के पूर्व, के पश्चिम आणि पी दक्षिण विभागात १६ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक देखभाल क्रियाकलाप सुलभ करण्यासाठी हे उपाय आवश्यक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले.

ट्रेंडिंग न्यूज

बीएमसीने अंधेरीच्या के पूर्व वॉर्डमध्ये दोन मुख्य जलवाहिन्या जोडल्या जाणार असल्याची माहिती दिली.सावंत मार्ग आणि कार्डिनल ग्रेशियस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेशियस मार्ग आणि सहार मार्ग जंक्शनपर्यंत हे काम केले जाईल. या व्यतिरिक्त, या कामादरम्यान जुनी खराब न झालेली १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी काढली जाईल. या कामाला येत्या २२ मे रोजी सकाळी ०९.०० वाजता सुरुवात होणार असून २३ मे रोजी सकाळी १० वाजता समाप्त होईल. संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले.

हे देखभालीचे काम पूर्ण झाल्यावर वेरावली जलाशय १,२ आणि ३ च्या पाणीपातळीत लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमसह जोगेश्वरी पूर्व आणि जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पूर्व आणि विलेपार्ले पश्चिम येथील पाणीपुरवठ्यात कायमस्वरूपी वाढ होईल.

'या' भागांत पाणीपुरवठा खंडित होणार

 

के पश्चिम विभाग:

सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप (सकाळी ७.३० ते दुपारी १२), जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग ( सकाळी ९ ते सकाळी ११), जुहू-कोळीवाडा झोन, देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जेव्हीएलआर ते जोगेश्वरी बस आगार) (सकाळी ११ ते दुपारी १) एस. व्ही. मार्ग जोगेश्वरी भाग – २, के पश्चिम (पाणीपुरवठा बंद), चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता (दुपारी १२.१५ ते २.१० चार बंगला झोनमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा), विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई पार्क, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर (दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०)

मोरागाव, जुहू गावठाण (दुपारी २.३०ते सायंकाळी ४.४०), यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (रात्री ९.३० ते रात्री १२), गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर (रात्री १० ते मध्यरात्री १२.३०)

के पूर्व विभाग:

त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, मातोश्री क्लब, दुर्गा नगर (सकाळी ८ ते ९), दुर्गा नगर, सारीपुत नगर (सकाळी १० ते दुपारी १२), दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदिर परिसर, जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्ता (सकाळी ९ ते सकाळी ११), बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर (सकाळी ११ ते दुपारी २), वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (दुपारी १.३० ते दुपारी ३.४०), विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोल डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग (सायंकाळी ५ ते रात्री ८), पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ (सायंकाळी ५ ते रात्री ८) जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर (रात्री ८ ते रात्री १०.३०)

पी दक्षिण विभाग:

बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) भाग (सायंकाळी ७ ते रात्री ९.३० दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा) राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) (सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.१५).

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग