Ganeshotsav 2023 : रात्रभर बाप्पाच्या दर्शनाची सोय, बेस्टचा गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganeshotsav 2023 : रात्रभर बाप्पाच्या दर्शनाची सोय, बेस्टचा गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय

Ganeshotsav 2023 : रात्रभर बाप्पाच्या दर्शनाची सोय, बेस्टचा गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय

Published Sep 18, 2023 10:17 AM IST

Ganeshotsav 2023 Mumbai : उद्यापासून गणेशोत्सवाची धुम पाहायला मिळणार आहे. त्यामुळं अनेकांनी गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली आहे.

Ganeshotsav 2023 Mumbai
Ganeshotsav 2023 Mumbai (HT)

Ganeshotsav 2023 Mumbai : उद्यापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळं अनेकांनी गणेशमूर्तीची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील अनेक ठिकाणी गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यातच आता मुंबईतील बेस्ट प्रशासनाने मुंबईतील गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील विविध ठिकाणी रात्रभर बेस्ट बस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत रात्रभर २० बसगाड्या सुरू ठेवण्यात येणार असून त्याद्वारे बाप्पाचं दर्शन घेणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत ही सुविधा देण्यात येणार असल्याचं बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. गणेशोत्सावाच्या काळात मुंबईत भाविक रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेत असतात. तसेच आरती आणि पूजेलाही भाविक गर्दी करतात. त्यामुळं रात्रीच्या वेळी भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी बेस्टने रात्रीच्या वेळी २० जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील असंख्य भाविक तीन ते पाच दिवसांचा गणपती घरात बसवत असतात. विसर्जन केल्यानंतर लोक गणपती मंडळाच्या गणेशमूर्तीचं दर्शन घेण्यास गर्दी करतात.

गणेशभक्तांना प्रवासासाठी २४ तास बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय बेस्टकडून घेण्यात आला आहे. मुंबईतील गणपतींचं दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशातील अनेक राज्यांतील भाविक गर्दी करत असतात. त्यामुळं मुंबईतील आणि मुंबई बाहेरून आलेल्या भाविकांच्या रात्रीच्या प्रवासाची सोय होणार आहे. काही साध्या, तर काही एसी सिंगल डेकर बस रात्रीच्या वेळी चालवण्यात येणार आहे. यामध्ये अंधेरी, दादर, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा, मुंबई सेंट्रल आणि वरळी या भागांसाठी अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या