मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Taxi and Auto Fare : रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार? संघटना आज भाडेवाढीचा प्रस्ताव देणार

Taxi and Auto Fare : रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार? संघटना आज भाडेवाढीचा प्रस्ताव देणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 05, 2024 02:05 PM IST

Auto, Taxi Unions Demand Fare Hike: रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी संघटनाने केली आहे.

taxi and auto fare
taxi and auto fare

Taxi and Auto Fare: महागाईचा सामना करणाऱ्या लोकांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आली. रिक्षा- टॅक्सी संघटना भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाच्या सचिवांना सादर करणार आहेत. टॅक्सीकरिता ४ रुपये आणि रिक्षाकरिता २ रुपये भाडेवाढीचा हा प्रस्ताव आहे. इंधनाचे वाढते दर आणि देखभाल दुरूस्तीचा खर्च, अशी अनेक कारणे देत रिक्षा आणि टॅक्सीचालक भाडे वाढवण्याची मागणी करीत आहेत.

या प्रस्तावासंदर्भात मुंबई टॅक्सी मेन्स युनियन ए.एल क्वाड्रोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहिवहन विभागाच्या सचिवांना भाडे दरवाढीचा प्रस्ताव सादर केला जाईल. मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेतला जात आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात अनुक्रमे दोन आणि तीन रुपयांनी वाढ केली होती. त्यावेळी रिक्षाचे भाडे २१ रुपयांवरून २३ करण्यात आले होते. तर, टॅक्सीचे भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये करण्यात आले. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच देखभाल आणि वाहनांच्या दुरुस्तीच्या खर्चामुळे भाडे परवडत नसल्याचे रिक्षा आणि टॅक्सी चालकाचे म्हणणे आहे.

महत्त्वाचे म्हणजे, भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला म्हणजे लगेचच भाड्यात वाढ होत नाही. यासाठी सगळ्या संघटनांसमोबत चर्चा केली जाते. सचिव स्तरावर बैठक घेतली जाते. भाडेवाढी करण्यामागील कारण जाणून त्यावर विचार केला जातो. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाकडून, याबाबत निर्णय घेतला जातो.

WhatsApp channel

विभाग