Mumbai news : सोमवारी दहावीचा निकाल लागला आहे. राज्याचा निकाल हा ९५.५ टक्के लागला आहे. या परीक्षेत मुंबईच्या रिक्षा ड्रायव्हरच्या मुलाने मोठे यश संपादन केले आहे. मुंबईतील आंबेमठ येथील रिक्षा चालकाच्या मुलाने अडचणीवर मात करत तसेच परिस्थितीचा बाऊ न करतजिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर १० वीत ९४.८ टक्के गुण मिळवले आहे. हर्षल प्रकाश असे या मुलाचे नाव आहे.
हर्षल प्रकाशचे वडील रिक्षा चालवतात. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. हर्षल हा येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेत असून त्याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या यशाबाबत हर्षल म्हणाला, ९ वीत असतांना त्याने दहावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. हर्षल दिवसांतुन काही तास अभ्यास करत होता. हर्षलने त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या शिक्षिका वनिता डावस यांना दिले आहे. ज्यांनी त्याला केवळ गणित आणि विज्ञान शिकवले नाही तर त्याच्या शाळेची फी देखील भरली. इयत्ता ७ पासून त्याला स्टेशनरी आणि पुस्तके सुद्धा विकत घेऊन दिली.
हर्षलच्या यशाबद्दल त्याच्या शिक्षिका वनिता डावस म्हणाल्या, हर्षल हा एक हुशार, मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थी आहे. त्याची आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण थांबू नये अशी माझी इच्छा होती. हर्षल अभ्यास करताना लक्ष केंद्रित करून संपूर्ण विषय पूर्णपणे समजून घेतो. त्याच्या हुषारीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. मी फक्त त्याला मदत केली आहे.
त्याच्या यशाबाबत हर्षल म्हणाला, त्याला डेटा सायन्स इंजिनिअर व्हायचे आहे आणि सायन्स शिकण्याची त्याची मनीषा आहे हर्षलचा धाकटा भाऊ देखील या वर्षी १० वीची परीक्षा देणार आहे. भावासाठी, जो यावर्षी दहावीची परीक्षा देणार आहे, तो म्हणतो कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचे असेल तर सुरुवातीपासूनच अभ्यास करा आणि उशीर करू नका, असे तो म्हणाला.