Mumbai: मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी, मुंबईतील मीरा रोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी, एकाचा मृत्य
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी, मुंबईतील मीरा रोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी, एकाचा मृत्य

Mumbai: मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी, मुंबईतील मीरा रोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी, एकाचा मृत्य

Jan 03, 2025 01:17 PM IST

Marathi Songs Vs Bhojpuri Songs: मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी? यामुळे दोन गटांत तुफान हाणामारी झाली, यात एका जणाचा मृत्यू झाला.

मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी, मुंबईतील मीरा रोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी
मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी, मुंबईतील मीरा रोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी

Mumbai News: मुंबईतील मीरा रोड येथे नवीन वर्षाच्या स्वागत करत करताना दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. डीजेवर मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी यावरून वाद पेटल्याचे सांगण्यात आले. म्हाडाच्या गृहसंकुलात १ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

राजा पेरियार (वय, २३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पेरियार हा आपल्या मित्रांसह मुंबईतील मीरा रोड येथे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करत होता. त्यावेळी एक गट मराठी गाण्यांवर नाचत होता. तर, दुसरा गट भोजपुरी गाण्याचा आग्रह धरत होता. या मतभेदामुळे वादावादी होऊन दोन गटात तणाव वाढला. यानंतर काही जणांना एकमेकांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात पेरियार आणि विपल राय गंभीर जखमी झाले. दोघांना मुंबईतील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी पेरियार याला मृत घोषित केले.

याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष जाधव आणि त्याचे नातेवाईक प्रकाश जाधव, अमित जाधव आणि प्रमोद यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर