Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Apr 29, 2024 06:38 PM IST

Mumbai airport receives hoax bomb call: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या फोनने एकच खळबळ माजली.
मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या फोनने एकच खळबळ माजली. (ANI)

Mumbai News: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) शनिवारी (२७ एप्रिल २०२४) झालेल्या बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतरअज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती देताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले की, विमानतळावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला शनिवारी विमानतळाच्या गेट नंबर १ (टर्मिनल-१) वर बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.

काही वेळातच एमआयएएलच्या अधिकाऱ्यांनी बॉम्बपथक आणि इतर सुरक्षा यंत्रणांना घटनेची माहिती दिली. त्या व्यक्तीने स्वत:ची ओळख सांगितली नसली तरी तो 'नवपाडा'वरून फोन करत असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी फोन करणाऱ्याव्यक्तीविरोधात भादंविकलम ५०५ (१) (ब), ५०६ (२) आणि ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-१ येथील मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) मध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला अज्ञात क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये बॉम्ब असल्याचे सांगितल्यानंतर बॉम्ब पथक आणि स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. आम्ही फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आरोपी पकडल्यानंतरच या कॉलमागचे कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

Karoli Ghat Bus Accident: इंदूरहून अकोल्याकडे येणारी खासगी बस दरीत कोसळली; २८ प्रवासी जखमी

मुंबई-बंगळुरू विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन

दरम्यान, मुंबई-बंगळुरू विमानात बॉम्बस्फोट ठेवल्याचा खोटा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. एफआयआरनुसार, मुंबईच्या देशांतर्गत विमानतळावरून निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मालाड येथील कॉल सेंटरवर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती.

बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या फोनमुळे खळबळ

हा संदेश विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि त्यानंतर देशांतर्गत विमानतळावरील अधिकाऱ्यांना लवकरात लवकर देण्यात आला. तोपर्यंत विमान ६७ प्रवाशांना घेऊन उड्डाणासाठी सज्ज झाले होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलरने ताबडतोब कॅप्टनला उड्डाणाला उशीर करण्यास सांगितले,' अशी माहिती विमानतळ पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने विमानाची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर