Mumbai Plane accident : कुणाच्या मणक्याला मार, तर कुणाचा गाल फाटला; मुंबई विमान अपघाताचं वास्तव समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Plane accident : कुणाच्या मणक्याला मार, तर कुणाचा गाल फाटला; मुंबई विमान अपघाताचं वास्तव समोर

Mumbai Plane accident : कुणाच्या मणक्याला मार, तर कुणाचा गाल फाटला; मुंबई विमान अपघाताचं वास्तव समोर

Sep 15, 2023 02:51 PM IST

Mumbai Airport Accident updates today : मुंबई विमानतळावर झालेल्या विमान अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

Mumbai Airport Accident
Mumbai Airport Accident

Mumbai Airport Accident udpates : मुंबई विमानतळावर गुरुवारी खासगी विमानाला झालेल्या अपघातात या विमानातील सहा प्रवासी आणि २ क्रू मेंबर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की विमानाचे दोन तुकडे झाले. सुदैवानं यात जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांना जबर मार लागला आहे. कुणाच्या मणक्याला मार लागला आहे तर कुणाचा गाल फाटल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातात जमखी झालेल्या आठही जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. नील नामक प्रवाशाच्या मणक्याला दुखापत झाल्यानं त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. अन्य सात जणांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.

जखमींमध्ये ध्रुव कोटक (वय ४०), अरुल दामोदर साळी (वय ५०), कॅप्टन सुनील कंजारभट (वय ४६), कामाक्षी श्रृंगारपुरे, कृष्णदास कोडालील, लार्स हेन्रिक, आकर्ष सेठी यांचा समावेश आहे.

ध्रुव कोटक यांच्या डोक्याला किरकोळ इजा झाली असून उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्या उजव्या हाताचा एमआरआय करण्यात येणार आहे.

अरुल दामोदर साळी यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मार लागला आहे. मात्र, त्यांच्या जिवाला कोणताही धोका नाही. कॅप्टन सुनील कंजारभट यांच्या छातीला व मणक्याला दुखापत झाली आहे. शरीरावर ओरखडे उठले आहेत.

कामाक्षी शृंगारपुरे यांच्या उजव्या खांद्याला व डाव्या भुवयीच्या ठिकाणी मार लागला आहे. ६० वर्षीय कृष्णदास कोडालिल यांना देखील बरीच दुखापत झाली आहे. मात्र उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत आहेत. लार्स हेन्रिक यांच्या फुफ्फुसातून रक्तस्त्रा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या छातीला व पाठीला मार लागला आहे. आकर्ष सेठी यांच्या मानेला दुखापत झाली आहे. मात्र, त्यांचीही प्रकृती स्थिर आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर