मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  jj flyover accident : मुंबईतील जेजे फ्लायओव्हरवर स्कूल बसला अपघात, एक विद्यार्थी गंभीर जखमी, पाहा Video

jj flyover accident : मुंबईतील जेजे फ्लायओव्हरवर स्कूल बसला अपघात, एक विद्यार्थी गंभीर जखमी, पाहा Video

Jun 26, 2024 06:48 PM IST

Mumbai Accident : ओव्हरटेक करताना स्कूल बसचा वेग अधिक होता. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस फ्लायओव्हरच्या कडेला असलेल्या रेलिंगवर आदळली.

स्कूल बसचा जेजे फ्लायओव्हरवर अपघात
स्कूल बसचा जेजे फ्लायओव्हरवर अपघात

Mumbai Accident : मुंबईतील जेजे उड्डाणपुलावर स्कूल बसचा मोठा अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. मुलांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल बसजेजे फ्लायओव्हरच्या साइड वॉलवर आदळली. बसमध्ये २० विद्यार्थी होते. या अपघातात एक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सांगितले जात आहे की, स्कूल बस चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हारटेक करण्याचा प्रयत्न केल्याननंतर हा अपघात आहे.

ओव्हरटेक करताना स्कूल बसचा वेग अधिक होता. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस फ्लायओव्हरच्या कडेला असलेल्या रेलिंगवर आदळली.

ट्रेंडिंग न्यूज

याबाबत पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनीबस चालकाला अटक केली आहे. लालू कुमार संटू (वय २४ वर्ष) असे अटक केलेल्या स्कूल बस चालकाचे नाव आहे. या अपघातात जखमी झालेल्या मुलाचे नाव इरफान (१२ वर्षे) आहे. त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बसमधील विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेचे एक वाहन घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. जेजे फ्लायओव्हरवर अपघातानंतर अपघातग्रस्त बस दाखवणारा व्हिडिओ जवळच्या इमारतीत राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीने शूट केला आहे.

कल्याणमध्ये भरधाव जीपने इंजिनीअरिंगच्या २ तरुणींना उडवलं -

कल्याणच्या रिंग रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने एका दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीवरून जात असलेल्या दोन तरुणीं गंभीर जखमी झाल्या आहेत. दुचाकीला धडक दिल्यानंतर जीप चालक तेथून पसार झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणी इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आहेत. सेजल भानुशाली व समीक्षा भानुशाली असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणींची नावे आहेत.

 

खडकपाडा पोलिसांनी जीप चालकाचा शोध सुरु केला आहे. हा अपघात कल्याण पश्चिमेकडील रिंग रोड येथील गांधारी पूलाजवळ झाला. कल्याण रिंग रोडचे काम काही ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यात वेगाने गाडी चालवण्याच्या घटनेमुळे या रिंग रोडवर अपघातांचा प्रमाण वाढले आहे.

 

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर