Mumbai Accident: मुंबईत लालबागच्या ब्रिजवर दुचाकीची कारला धडक; पित्यासह मुलाचा मृत्यू, आई व मुलीची प्रकृती गंभीर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident: मुंबईत लालबागच्या ब्रिजवर दुचाकीची कारला धडक; पित्यासह मुलाचा मृत्यू, आई व मुलीची प्रकृती गंभीर

Mumbai Accident: मुंबईत लालबागच्या ब्रिजवर दुचाकीची कारला धडक; पित्यासह मुलाचा मृत्यू, आई व मुलीची प्रकृती गंभीर

Feb 06, 2024 02:08 PM IST

Motorcycle Crashes Into Car In Mumbai: मुंबईच्या लालबाग उड्डाणपुलावर दुचाकी आणि कारच्या धडकेत पित्यासह मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Mumbai Accident
Mumbai Accident

Mumbai Lalbaug Flyover Accident: मुंबईच्या लालबाग उड्डाणपुलावर रविवारी रात्री सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ३९ वर्षीय व्यक्तीसह त्याच्या १२ वर्षाच्या मृत्यू झाला. तर, मृताची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील कार चालकाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

सोहेल शेख (वय, ३९) आणि त्यांचा मुलगा मोहम्मद अली शेख (वय, १२) अशी मृतांची नावे आहेत. तर, सोहलची पत्नी आसमा शेख आणि मुलगी फातिमा शेख (वय, ४) अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सोहेल शेख त्याच्या कुटुंबासोबत लालबाग उड्डाणपुलावरून घरी जात असताना समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा इतका भीषण होता की, धडकेनंतर दुचाकी घसरली आणि सोहल आणि त्याचा मुलगा मोहम्मद दोघेही पुढे फेकले गेले. तर, आसमा आणि फातिमा रस्त्यावर पडली.

या अपघातानंतर चौघांनाही केईएम रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी सोहेल आणि मोहम्मदला मृत घोषित केले. आसमा आणि फातिमा यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात आसमाला गंभीर दुखापत झाली. तिच्या खांदा, पाय आणि हाताला फ्रॅक्चर झाले.

भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या इतर कलमांनुसार, पोलिसांनी कार चालकाला अटक केली. त्याला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर