Mumbai Accident: मुंबईत भरधाव डंपरची दाम्पत्याच्या दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident: मुंबईत भरधाव डंपरची दाम्पत्याच्या दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Mumbai Accident: मुंबईत भरधाव डंपरची दाम्पत्याच्या दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Feb 20, 2024 10:49 AM IST

Mumbai Hit And Run: मुंबईच्या कांदिवली पूर्व येथे हिट अँड रनच्या घटनेत ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Accident
Accident

Mumbai Kandivali Accident: मुंबईच्या कांदिवली पूर्व येथे एका भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

मंगेश कांबळे (वय, ३६) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, स्वाती कांबळे (वय, ३४) असे अपघातात जखमी झालेल्या माहिलेचे नाव आहे. मंगेश आणि स्वाती यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली. ते कांदिवली पूर्व येथे वास्तव्यास होते. हे दाम्पत्य रविवारी सकाळी ११ वाजता दुचाकीवरून विलेपार्लेच्या दिशेने निघाले. दुपारी चार वाजताच्या सुमारास खरेदीकरून परतल्यानंतर या दाम्पत्याने कांदिवलीतील आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. कांदिवली पश्चिम-पूर्व उड्डाणपुलाजवळील न्यू कल्पतरू इमारतीजवळ पोहोचले. त्यावेळी भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला डाव्या बाजूने ओव्हरटेक केला असता हा अपघात घडला.

स्वाती यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामुळे आम्ही दोघेही रस्त्यावर पडलो आणि मंगेशने हेल्मेट घातल्याने त्याच्या खांद्याला आणि पाठीला दुखापत झाली. अपघातानंतर डंपर चालकाने त्यांना रुग्णालयात न नेता किंवा दाम्पत्याला कोणतीही वैद्यकीय मदत न देता घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळी जमा झालेल्या जमावाने दाम्पत्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मंगशे यांना मृत घोषित करण्यात आले.

समता नगर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली बेदरकारपणे वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून डंपरचालकाची ओळख पटवण्याचा आणि त्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती समता नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर