Mumbai : पाण्याच्या टँकरची दुचाकीला समोरून धडक, २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू, मुंबईतील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai : पाण्याच्या टँकरची दुचाकीला समोरून धडक, २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू, मुंबईतील घटना

Mumbai : पाण्याच्या टँकरची दुचाकीला समोरून धडक, २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू, मुंबईतील घटना

Dec 07, 2024 09:39 AM IST

Mumbai Hit and Run: मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे समोरून येणाऱ्या भरधाव टँकरच्या धडकेत एका मॉडेलचा मृत्यू झाला.

समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक
समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक

Mumbai Accident News: मित्राच्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या भरधाव टँकरच्या धडकेत २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला. तर, तिचा मित्र गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर टँकरचालक फरार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

शिवानी सिंह असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती मालाड येथे वास्तव्यास होती. दरम्यान, गुरुवारी रात्री शिवानी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना वांद्रे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शिवानी आणि तिचा मित्र गंभीर जखमी झाले. यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले. तर, तिच्या मित्राच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे सांगून पुढील उपचार सुरू केला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अपघातानंतर टँकर चालकाने पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर