Mumbai: बाल्कनीत खेळत होती, अचानक तोल गेला; तिसऱ्या मजल्यावरून पडून ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: बाल्कनीत खेळत होती, अचानक तोल गेला; तिसऱ्या मजल्यावरून पडून ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Mumbai: बाल्कनीत खेळत होती, अचानक तोल गेला; तिसऱ्या मजल्यावरून पडून ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Updated Jul 11, 2024 08:40 AM IST

Mumbai kandivli News: मुंबईतील कांदिवली येथे बाल्कनीतून पडून ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
मुंबईत तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Mumbai 9-year-old falls from 3rd floor: मुंबईच्या कांदिवली परिसरात धक्कादायक घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगी आपल्या भावंडांसह बाल्कनीत खेळत होती. मात्र, अचानक तिचा तोल गेला आणि ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. मुलीच्या वडिलांनी तिला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिया विश्वकर्मा (वय, ९) असे बाल्कनीतून पडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. आशिया ही इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी असून आपल्या कुटुंबासोबत कांदिवली येथे भाड्याने राहत होती. मंगळवारी आशियाचे वडील मानसिंह विश्वकर्मा यांची तब्येत ठिक नसल्याने ते आराम करत होते. मात्र, अचानक त्यांना पुतण्यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी बाल्कनीत जाऊन पाहिले तर त्यांचे दोन्ही पुतणे तुटलेल्या ग्रीलला लटकले होते आणि आशिया गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसली. त्यांनी पटकन दोन्ही मुलांना वर काढले आणि तळमजल्यावर धाव घेतली. मानसिंहने तिला तातडीने बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास आशियाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आशियाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आशियाचा मृतदेह तिच्या कुटुंबांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र, या घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.

वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा पाण्यात बडून मृत्यू

जुईनगर येथील रहिवासी राज संजय सांगरे (वय २८) या तरुणाचा मंगळवारी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मित्रासोबत वेळ घालवताना बुडून मृत्यू झाला. नेरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडीत नियमित पोहणारा सांगरे दारूच्या नशेत असल्याने तो पाण्यात बुडाला. जुईनगर सेक्टर-२३ मधील परशुराम सोसायटीत डिलिव्हरी बॉय सांगरे हा आई-वडिलांसोबत राहत होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगरे आणि त्याच्या मित्राने दुपारी तीनच्या सुमारास जुईनगर सेक्टर-२४ मधील मंगलप्रभू रुग्णालयाजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पार्टी करण्याचे ठरविले. दोघांनी खड्ड्यात उडी मारून पोहायला सुरुवात केली, पण पाण्याचा अंदाज न आल्याने सांगरे बुडून मृत्यू झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर