Goregaon Electrocution News: मुंबईच्या (Mumbai) गोरेगाव (Goregaon) येथील रहिवासी सोसायटीत धक्कादायक घटना घडली.विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शनिवारी सोसायटीतील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांकडून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यवीर चौधरी (वय, ९) असे वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आर्यवीर शनिवारी संध्याकळी ७.३० वाजताच्या सुमारास सोसायटीच्या तळमजल्यावरील बागेत खेळण्यासाठी गेला. मात्र, खेळत असताना तो उघड्या विद्युत तारेच्या संपर्कात आला. यानंतर अजय चौधरी एका व्यक्तीच्या मदतीने आर्यवीरला गोरेगाव पूर्व येथील गोकुलधाम रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
मुलगा गमावल्याचा धक्क्यातून सावरल्यानंतर अजय यांनी रहिवाशी सोसायटीतील चार जणांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यासह आणि एका जणाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा जवळील माजरी येथे एका धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसादातून १२५ जणांना विषबाधा झाली. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर, काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. रुग्णांमध्ये २४ मुलांसह ३० महिला आणि ६ पुरुष आहे. त्यांच्याजवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाप्रसादात वरण-भात, भाजी, पोळी व बुंदी हे पदार्थ होते. महाप्रसादाचे जेवण जेवल्यावर काही वेळातच नागरिकांना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. यानंतर त्यांना माजरी येथील वेकोली येथील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.