Malad Building Fire News: मालाड-पश्चिम येथे मंगळवारी (१६ एप्रिल २०२४) सकाळी बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत आठ जण होरपळून गेल्याची घटना घडली. यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील अंकल किचेन्सजवळील सुंदर लेनमधील गिरनार गॅलेक्सी इमारतीला आज सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. या आगीत ८ जण होरपळले.जखमींना सुरुवातीला थुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना अरोली बर्न रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीररित्या भाजलेल्या रुग्णांना शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. आगीच्या घटनेत जखमी झालेल्या आठ जणांपैकी बहुतांश ज्येष्ठ नागरिक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता मेनिंजेस (वय, ५२), रेझिनार्ड डिसूझा (वय, ७३), अँथनी मोहसिन (वय, ४७), अँथनी फर्नांडिस (वय, ६८), लेविना मुकादम (वय, ७३), मार्शल मुकादम (वय, ८०), विनिजॉय मुकादम, मेरी जेमी (वय, ६६) अशी आगीत जखमींची लोकांची नावे आहेत.
पुण्यात कात्रज परिसरात फॉरेन सिटी एक्झिबेशन येथील आनंद मेळाव्यात वडिलांसोबत गेलेल्या ८ वर्षाच्या मुलांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश राजू पवार असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. गणेश यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका मैदानात फॉरेन सिटी एक्झिबेशनचे आयोजन करण्यात आले, जिथे लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळणी व साहित्य लावण्यात आले. शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी स्थानिक लोक भेट देत असतात. गणेश हा देखील त्यांच्या वडिलांसोबत या ठिकाणी गेला होता. आकाश पाळण्यात बसण्यासाठी जात असताना विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने गणेशचा मत्यू झाला.
संबंधित बातम्या