४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले, मुंबईत ७८ वर्षांपूर्वी घडली होती भयंकर घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले, मुंबईत ७८ वर्षांपूर्वी घडली होती भयंकर घटना

४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले, मुंबईत ७८ वर्षांपूर्वी घडली होती भयंकर घटना

Dec 20, 2024 09:59 PM IST

Mumbai Boad Accident: मुंबईत ७८ वर्षांपूर्वी प्रवाशांना घेऊन जाणारी जहाज समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत ६०० हून अधिक लोकांचा बुडून मृत्यू झाला होता.

४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले
४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले

Mumbai Boat Capsized News: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ बुधवारी नौदलाची स्पीड बोट धडकल्याने प्रवाशी बस समुद्रात उलटली. या दुर्घनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बोट गेट ऑफ इंडियाहून एलिफंटा बेटापर्यंत प्रवाशांना घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पंरतु, तुम्हाला माहिती आहे का? मुंबईमध्ये ७८ वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती, जेव्हा ६०० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले. ही घटना मुंबईत घडलेल्या मोठ्या दुर्घटनापैकी एक आहे.

१९४७ साली भारत स्वातंत्र्य होण्याआधी एमएस रामदास नावाचे जहाज समुद्रात बुडाले. ही बोट भाऊच्या धक्क्याकडून रेवस येथे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, त्याआधीच बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत ६०० पेक्षा जास्त जणांचा बुडून मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै १९४७ साली सकाळी ८ वाजता एमएस रामदास बोट भाऊच्या धक्क्याकडून रेवसच्या दिशेने जात होती. ही बोट बंदरापासून ७.५ किमी अंतरावर गेली असता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बोट पुढे जात असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यामुळे समुद्रात उंच लाटा उसळल्या आणि बोट उलटली. त्यानंतर हळूहळू बोटीत पाणी भरले. बोटीत पाणी शिरत असल्याचे पाहून प्रवासी घाबरले. प्रवाशांना पोहता येत होते, त्यांनी पटापट समुद्रात उडी घेत जीव वाचवला तर काही जण अडकून पडले. सकाळी ९ वाजताच्या सुमारास पूर्ण जहाजच समुद्रात बुडाले.

जहाज मुंबईहून रेवासला पोहचण्यासाठी दीड तास लागतो. हे जहाज बुडाल्याची माहिती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणालाच नव्हती. जहाजात असलेल्या एका १० वर्षाच्या मुलाने कसाबसा मुंबईचा किनारा गाठला. त्यानंतर एमएस रामदास जहाज समुद्रात बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कंपनीने घटनास्थळी दोन बोटी मदतीसाठी पाठवल्या. मात्र, तोपर्यंत सर्वकाही संपले होते. या घटनेत जवळपास साडे सहाशे लोकांचा मृत्यू झाला. बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे दहा वर्षांनी म्हणजे १९५७ मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पिअरच्या समुद्रकिनार्‍यावर वाहात आले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर