Mumbai: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, मुंबईतील दादर येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, मुंबईतील दादर येथील घटना

Mumbai: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, मुंबईतील दादर येथील घटना

Jan 03, 2025 07:33 AM IST

Mumbai Dadar Suicide News: मुंबईतील दादर परिसरात आजारपणाला कंटाळून एका वृद्ध महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

मुंबई: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची आत्महत्या
मुंबई: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची आत्महत्या

Mumbai News: मुंबईतील दादर येथे एका वृद्ध महिलेने गुरुवारी (२ जानेवारी २०२५) निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.भोईवाडा पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली. मृत महिलेने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती नारायण गांधी (वय, ७६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. भारती या मोराची वाडी येथील जीडी आंबेडकर रोडवरील मोहन नाईक सोसायटीतील वास्तव्यास होत्या. दरम्यान, गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी सातव्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भारती या २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून मोहन नाईक सोसायटीत राहत होत्या. मात्र, त्या उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त होत्या. दरम्यान, ७ सप्टेंबर २०२४ त्यांच्या पतीचे निधन झाल्यापासून त्या मानसिक तणावात होत्या, अशी माहिती भारती यांच्या नातेवाईकांनी भोईवाडा पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

देशात आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा

भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा मानसिक तणावातून लोक आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल, याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणती चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर