Mumbai: खेळताना दोरीचा फास लागून ७ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, मुंबईतील शिवाजीनगर येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: खेळताना दोरीचा फास लागून ७ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, मुंबईतील शिवाजीनगर येथील घटना

Mumbai: खेळताना दोरीचा फास लागून ७ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, मुंबईतील शिवाजीनगर येथील घटना

Published Jul 30, 2024 05:48 PM IST

Mumbai Govandi Girl Hanging Death: मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरात खेळताना दोरीचा फास लागून ७ वर्षाच्या मुलीच्या फास लागून मृत्यू झाला.

खेळताना दोरीचा फास लागून ७ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
खेळताना दोरीचा फास लागून ७ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Mumbai Shivaji Nagar Girl Dies by Hanging: मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरात खेळताना दोरीचा फास लागल्याने सात वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत मुलगी भावडांसोबत लपाछपीचा डाव खेळत असता ही घटना घडली. त्यावेळी तिचे आई-वडील घरात नव्हते. शेजाऱ्यांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकृती सिंह असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान, आकृती ही रविवारी तिच्याभावंडासह लपाछपीचा खेळ खेळत होती. लपाछपीचा डाव सुरु असताना सगळे वेगवेगळ्या ठिकाणी लपले. तर, आकृती ही पोटमाळ्यावर लपली. खेळ सुरु असताना पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या शिडीच्या दोरीचा फास तिच्या गळ्यात अडकला. हे पाहिल्यानंतर आकृतीच्या मोठ्या बहिणीने आरडाओरडा सुरू केला. तसेच शेजाऱ्यांना या घटनेबाबत माहिती दिली. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आकृतीला परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली.

नवी मुंबईतील २० वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी कर्नाटकातून आरोपीला अटक

नवी मुंबईतील उरण रेल्वे स्थानकाजवळ एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी कर्नाटकातील एका तरुणाला ठार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी दाऊद शेखयाला शेजारच्या कर्नाटकातील गुलबर्गा येथील शहापूर परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्या आधारे २०१९ मध्ये लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पीडिता आणि शेख एकमेकांच्या संपर्कात होते आणि हत्येच्या दिवशी त्यांची भेट झाली होती. दोघांमधील वादातून ही हत्या झाली असावी, मात्र गुन्ह्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे. २५ जुलै रोजी तिच्या पालकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर येथे काम करणारी पीडित तरुणी अर्ध्या दिवसाची रजा घेऊन गेली होती.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी आठ पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी सुरुवातीला अनेक संशयितांना ताब्यात घेतले होते, ज्यांची माहिती त्यांना शेखपर्यंत घेऊन गेली. शवविच्छेदन अहवालात पीडितेचा मृत्यू चाकूने झालेल्या जखमांमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.शेख हा काही काळ उरण येथे राहत होता. परंतु, पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तो कर्नाटकात गेला आणि २०१९ मध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शेजारच्या राज्यात ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि पीडित मुलगी त्याच्या संपर्कात होती. या महिलेचा मोबाइल सापडला नसून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. शेखने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील चौकशीसाठी त्याला नवी मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर