Pydhonie murder : झोपलेला असताना लाईट चालू केल्यानं पेटला वाद; भाऊ आणि पुतण्यांकडून वृद्धाची हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pydhonie murder : झोपलेला असताना लाईट चालू केल्यानं पेटला वाद; भाऊ आणि पुतण्यांकडून वृद्धाची हत्या

Pydhonie murder : झोपलेला असताना लाईट चालू केल्यानं पेटला वाद; भाऊ आणि पुतण्यांकडून वृद्धाची हत्या

Jul 29, 2024 01:48 PM IST

Mumbai Pydhonie Murder News: मुंबईत भाऊ, पुतण्या आणि मुलाकडून ६५ वर्षीय व्यक्तीची हत्या आरोपीला अटक केली आहे. झोपलेला असताना लाईट चालू केल्यामुळे पेटलेल्या वादातून ही हत्या करण्यात आली.

मुंबईतील पायधुनी परिसरात वृद्धाची हत्या
मुंबईतील पायधुनी परिसरात वृद्धाची हत्या

65-Year-Old Man Kills By Relatives: मुंबईतील (Mumbai) पायधुनी (Pydhonie) येथे एका ६५ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच भावाने, मुलाचा मुलगा आणि पुतण्याने अशी हत्या केल्याची घटना शनिवारी घडली. पोलिसांनी आरोपी युनूस शेख (वय, ५८), त्याचा मुलगा सोहेल युनूस शेख (वय, २६) आणि पुतण्या अजीज जमील शेख (४१) यांना अटक केली आहे.

मृताचे वडिलोपार्जित घर असलेल्या पायधुनी परिसरातील आर. आर. रोडवरील अजिला बिल्डिंगमध्ये हे सर्व जण एकत्र राहतात. मृताचा भाऊ मोहम्मद इदरीश शेख (वय, ५४) याने फिर्याद दिली असून तो टेलरचे काम करतो आणि पत्नी व तीन मुलांसह एकाच घरात राहतो.

फिर्यादीनुसार, मृत सलीम शेख हा हॉलमध्ये झोपलेला असताना सोहेलने अचानक लाईट चालू केली. त्यामुळे संतापलेल्या शेख यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शाब्दिक चकमक वाढल्याने सोहेलचे चुलत भाऊ अजीज आणि अमीन यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतापलेल्या सलीम शेखने आपल्या दोन्ही पुतण्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर युनूस, सोहेल आणि अजीज यांनी सलीमला लाथा- बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम हा दम्याचा रुग्ण आहे. सलीमला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तो खाली बसला आणि आपले इनहेलर शोधू लागला. घरातील इतर सदस्यांनी त्याला इनहेलर आणून दिले. पण त्याला श्वास घेता येत नव्हता. त्यांनी सलीमला तातडीने जेजे रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच शेख यांचा मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

पत्नी रेश्मा यांना अहमदनगर जिल्ह्यात नोकरी लागल्याने शेख काही महिन्यांपूर्वी वडिलोपार्जित घर सोडून पत्नीसोबत राहत होते. दम्याच्या उपचारासाठी ते महिन्यातून एक- दोन वेळा मुंबईत यायचे. दोन दिवसांपूर्वी तो शहरात आले होते. पायधुनी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध बीएनएस कलम १०५ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

 

मुंबई: मालाडमध्ये भरधाव टेम्पोनं नर्सला उडवलं, जागीच मृत्यू

मुंबईतील मालाडमध्ये एका भरधाव टेम्पोनं नर्सला धडक दिली. या धडकेत नर्सचा जागीच मृत्यू झाला. रेहाना मालपेकर (वय, ४६) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक आरिफ शेखला अटक केली आहे. या प्रकरणी मालपेकर यांच्या २१ वर्षीय मुलाने पोलिसांत फिर्याद दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर