Mumbai News: मुंबई विमानतळावरून चोरीला गेलेल्या आयफोनच्या मदतीने मालकाच्या खात्यातील जवळपास दीड लाख रुपये गायब केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका अज्ञात व्यक्ती आयफोन चोरी करताना दिसला. हा संपूर्ण प्रकार ८ फेब्रुवारी मध्यरात्री १२.४५ मिनिटांनी घडला. याप्रकरणी सहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता हे नुकतेच आपल्या वयैक्तिक कामासाठी कोलकाताला गेले होते. दरम्यान, ८ फेब्रुवारी रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास ते मुंबई विमानतळावर उतरले. त्यानंतर आपली बॅग घेण्यासाठी बेल्ट १३ येथे पोहोचले. सामान परत आणताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा आयफोन चोरला. तसेच त्यांच्या खात्यातून पैसे गायब केले.
दत्ता यांच्या एचडीएफडी बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी ताबडतोब त्यांचे खाते ब्लॉक केले. यानंतर दत्ता यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला माहिती दिली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता असे दिसून आले की, जेव्हा दत्ता त्यांची बॅग घेत होते, त्यावेळी तिथे उभा असलेल्या एक व्यक्ती फोन चोरून नेताना दिसला. तो व्यक्ती २५-३० वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
इतर फोनच्या तुलनेत आयफोन आपल्या सुरक्षेसाठी ओळखला जातो. मात्र, मुंबईतील विमान घडलेल्या या घटनेनंतर आयफोनही सुरक्षित नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नुकतेच केंद्र सरकारने आयफोन ८ आणि त्यानंतरच्या एडिशनसाठी हाय रिस्क अलर्ट जारी केला. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि इंडियन कम्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमच्या वतीने आयफोन वापरकरत्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आयफोन ८ नंतरच्या सॉफ्टेअरमध्ये सुरक्षा धोक्याचे अनेक दोष आढळून आले. त्यामुळे सायबर गुन्हेगार फसवणूक करू शकतात. अँड्राईड १२, १३, १४, १५ आणि आयफोन ८ ते ११ पर्यंतच्या फोनला हॅकिंगचा धोका आहे.हे डिव्हाइस ताबडतोब अपडेट करणयाचा सल्ला देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या