Kandivali suicide : मुंबईतील कांदिवली येथे महिलेची ९व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या-mumbai 60 year old woman dies by suicide by jumping from the 9th floor in kandivali ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kandivali suicide : मुंबईतील कांदिवली येथे महिलेची ९व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

Kandivali suicide : मुंबईतील कांदिवली येथे महिलेची ९व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

Jan 08, 2024 05:57 PM IST

Mumbai Kandivali woman suicide News : मुंबईच्या कांदिवली परिसरात एका ६० वर्षीय महिलेने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Mumbai Kandivali Suicide: मुंबईच्या कांदिवली परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली. एका महिलेने इमारतीच्या ९व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगला प्रवीण राठोड (वय, ६०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मंगला या कांदिवली परिसरातील एका इमारतीतीत आपल्या कुटुंबियांसोबत राहत होत्या. मात्र, त्यांनी आज सकाळी इमारतीच्या ९व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच समता नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मंगला राठोड यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि सून असा परिवार आहे.

यापूर्वी ३१ डिसेंबर २०२३ रोजी पतीच्या मृत्युची चुकीची बातमी ऐकून एका गर्भवती महिलेने आत्महत्या केली. ही घटना ओडिशा राज्यातील भुवनेश्वर शहरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एसी काँप्रेसरच्या स्फोटात एक मॅकेनिकचा मृत्यू झाला. मॅकेनिकच्या मृत्यूची बातमी ऐकून महिलेने नैराश्यातून आत्महत्या केली. मात्र, एक आठवड्यानंतर समजले की, स्फोटात मरण पावलेली व्यक्ती आत्महत्या केलेल्या महिलेचा पती नसून दुसराच व्यक्ती आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. दरम्यान, सूनेच्या मृत्यूसाठी सासूने रुग्णालय प्रशासनास जबाबदार धरले आहे.

विभाग